Homeराशीभविष्यआजचे राशिभविष्य (दिनांक ५ फेब्रुवारी २०२३)

आजचे राशिभविष्य (दिनांक ५ फेब्रुवारी २०२३)

जाणून घ्या आज रविवार दिनांक ५ फेब्रुवारी २०२३ रोजीचे आपले राशिभविष्य

मेष – परिवारात शुभ कामाचे आयोजन केले जाईल. खर्चाचा आवाका जपा. व्यापारात परिस्थिती चांगली राहील. बेरोजगारांना रोजगाराची संधी प्राप्त होईल. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. नवीन उपक्रम राबवू शकाल. कौटुंबिक जीवनात मनासारख्या घटना घडतील. अचानक लाभ होण्याची शक्यता असून वारसा हक्काचे प्रकरण मार्गी लागेल. अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तींसोबत परिचय होईल. चांगल्या विचारांचा लाभ होईल. मानसन्मान वाढेल. घर,वाहन खरेदीचा योग आहे.

वृषभ – महत्वपूर्ण कागदपत्रे मात्र संभाळा. नोकरीत योजलेले काम वेळेत पूर्ण होईल. प्रत्येक क्षेत्रात मान सन्मान मिळेल. उत्पनात वाढ होईल. तिर्थक्षेत्री प्रवास घडेल. व्यापाराच्या दृष्टीने चांगला दिवस आहे. नवीन प्रकल्पात गुंतवणुकीसाठी व शुभ कार्यासाठी दिनमान उत्तम राहिल. तुमच्या कार्यक्षेत्रात अनेकांचे सहकार्य लाभेल. विवाह इच्छुकांचे विवाह जमतील. निरनिराळ्या सुचणाच्या कल्पना आमलात आणा. परदेशगमनाचा योग आहे. प्रवासातुन मोठे लाभ घडतील आरोग्य उत्तम राहील. सामाजिक क्षेत्रातील व्यक्तिंच्या मानसन्मानात वाढ होईल. प्रतिष्ठीत व्यक्तींच्या संपर्कात प्रतिष्ठा वाढेल.

मिथुन – बांधकाम रिअल इस्टेट इत्यादी क्षेत्रातील व्यक्तींना भरभराटीचा दिवस आहे. रोजगारात यश मिळेल. प्रत्यक्ष दूरदर्शीपणाने योग्य कामे होतील.व्यवसायातील वातावरण चांगले राहील.अचानक लाभ होण्याचे योग आहेत. वारसा हक्काची प्रकरण मार्गी लागेल. मान्यवर व मोठ्या व्यक्तींचा सहवास लाभेल. नोकरीत प्रमोशनची शक्यता असून व्यवसायात असणाऱ्यांची चांगली उन्नती होईल. घरातील कौटुंबिक वातावरण चांगले राहील. चांगल्या भावनेने काम करा. आपल्या अंगीभूत कलागुणांसाठी चांगले वातावरण आहे. संततीकडून शुभवार्ता समजतील. हातातून विधायक कार्य घडेल.

कर्क – व्यापारी वर्गकरीता महत्वाचा योग. आज उत्पन्नात वाढ होणार आहे. प्रवासातून देखील लाभ होईल. नोकरदार बढती प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. घरगुती सुविधेत वाढ होईल. वरिष्ठाची मदत मिळेल. कामाप्रती विशेष ओढ निर्माण होईल. काही नव-नवीन कल्पना आमलात आणा. क्रिएटिव मंडळीसाठी आजचा दिवस स्पेशल आहे. चंद्रबल उत्तम लाभलेले आहे. संधीचं सोनं करा. विचलीत होऊ नका. शासकीय कामकाजात यश प्राप्त होईल. सामाजिक राजकिय क्षेत्रातील व्यक्तींच्या मानसन्मानात वाढ होईल.

सिंह – मानसिक बौद्धिक ताण वाढेल. व्यक्तिगत समस्या निर्माण होतील. कौटुंबिक जबाबदारीकडे लक्ष द्या. आहारात नियमितता ठेवा. बुद्धीचे कामे अधिक करू नका. मानसिक आणि शारिरिक थकवा जाणवेल. नुकसानीची घटना घडण्याची शक्यता आहे. कर्ज घेणे आज टाळा. घाई, गडबडीतील निर्णय अंगाशी येऊ शकतात. प्रवास नुकसानकारक राहील. मान अपमानचे प्रसंग घडतील. नोकरीत प्रतिस्पर्धी वरचढ होतील. कामात असंतोषजनक वातावरण राहील. लोकांचा विरोध व असहकार्य लाभेल. मानसिक शांती राखण्याचा प्रयत्न करा.

कन्या – नोकरीत अनुकुलता जाणवेल. शासकीय नोकरदारासाठी सफलदायक दिवस आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपेक्षेप्रमाण यश मिळेल. विवाहइच्छुकांचे विवाह जुळतील.कायदेशीर कामात यश मिळेल. नोकरीत धाडसी निर्णय घ्याल. अपेक्षित यश लाभेल. गृहसौख्य,पत्नीची साथ मिळेल. व्यापारात आर्थिक प्राप्तीत वाढ होईल.भागीदाराकडून उत्तम सहकार्य लाभेल.व्यापारात लाभ होईल. लेखन, कला, कायदा क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार मिळतील. व्यवाहारिक समस्या दूर होईल. आरोग्य उत्तम राहणार आहे.व्यवहारात आर्थिक लाभ झाल्याने आंनदी रहाल.

तूळ – पदप्राप्ती मानसन्मान मिळेल. जनहितार्थ निर्णय घ्याल. व्यवसायात धाडसी निर्णय घ्याल. भांवडाकडून सहकार्य लाभेल.व्यापारात नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. मित्रमैत्रीणेचे सहकार्य लाभेल.मनोबल उंचावेल. प्रवासातुन लाभ होईल. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. आरोग्य देखील उत्तम असणार आहे. शुभ कार्यात सामील व्हाल. मान सन्मान मिळेल. प्रयत्नाच्या तुलनेत लाभ अधिक होईल. नोकरीत स्थान बदल होण्याची शक्यता आहे.नोकरीत प्रमोशन होईल. वरिष्ठांकडून सहकार्य लाभेल. व्यवसायिक मंडळीना नवीन व्यापार सुरू करण्याकरिता उत्तम दिनमान आहे.

वृश्चिक – रचनात्मक कामात यश मिळेल. मनोबल वाढेल. कुंटुबातील व्यक्तीकडून विशेष सहकार्य मिळेल. मोठ्यांची मर्जी व मान राखाल. रोजगारात वाढ होईल समृद्धी लाभेल. खर्चावर काहीस नियंत्रण ठेवावे लागेल. व्यापारात आर्थिक योग उत्तम आहे. आध्यात्मिक कार्य घडेल. दुरवरच्या प्रवासातून लाभ होतील. शासकीय कामात शुभ दिवस आहे अध्यात्म,गुढशास्त्राची आवड निर्माण होईल. परमेश्वरावर श्रद्धा ठेवा. धनलाभ होण्याची शक्यता आहे. प्रतिष्ठा वाढेल.धार्मिक, शिक्षण क्षेत्रात कर्तुत्वाची संथी मिळेल. साधुसंत व्यक्तिंच्या सहवास लाभेल. कुटुंबातील वातावरण आनंददायक राहील.

धनु – घातपातच भय रहिल.आजार उदभवून शस्त्रक्रियासारखी घटना संभवते.दुर्घटना गंभीर दुखापततीची शक्यता आहे. दिवस कष्टदायक स्वरूपाचा आहे.घरात वादविवादाचे प्रसंग शक्यतो टाळावेत. मन आणि वाणीवर नियंत्रण ठेवा. दुःखद घटना ऐकायला मिळतील. अनिद्रेचा त्रास उद्भभवू शकतो. निराशाजनक परिणाम येण्याची शक्यता आहे. मानसिक अस्वस्थता जाणवेल. रागावर नियंत्रण ठेवा. वादविवाद होण्याची शक्यता अधिक आहे. आर्थिक हानी अथवा खर्चात वाढ होईल. उत्पन्नापेक्षा खर्च आधिक होईल. कायदेशीर प्रकरणात कारवाई होण्याची शक्यता आहे.

मकर – परिवारात स्नेहपूर्वक वातावरण निर्माण होईल. नवीन व्यवसायिक घटना घडणार आहे.वेगवेगळ्या मार्गाने धनलाभ होतील.नवे मित्रमैत्रिणी भेटतील. संततीकरिता आजचा दिवस उत्सहाचा आहे.प्रवासाचे योग घडतील. कुटुंबातील सुखद वातावरणात वृद्धी होईल. आज गुंतवणूक करा. भविष्यात ही गुंतवणुक फायदेशीर ठरेल. प्रोत्साहन मिळेल. नोकरीत नवीन योजना प्रकल्प कार्यान्वित होतील. मित्रमैत्रिणी व जोडीदारांकडून सहकार्य लाभेल. नव्या बौद्धिक कल्पनाबरोबरच नव्या विचारांचा मनावरचा प्रभाव वाढेल.दिनमान उत्साहवर्धक राहील.परदेशगमनाचे योग आहेत.विवाह इच्छूकांचे विवाह जुळतील.

कुंभ – मनाची चलबिचल वाढेल. व्यापारात देण्या-घेण्याच्या व्यवहारात सावध राहा. संततीकडे विशेष लक्ष दयावे. मुलांच्या कामावर नजर ठेवा. आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष केल्याना मोठ्या समस्या उद्‌भवतील. चंद्रबल अनिष्ट आहे. नोकरीत मान, प्रतिष्ठा संभाळावी. हितशत्रुचा त्रास जाणवेल. आपल्या विरोधात वातावरण तयार होऊ नये याची काळजी घ्या. निरर्थक कामात आपला वेळ जाणार आहे. वेळेचा अपव्यय टाळा. स्थावर मालमत्तेबाबत अडचण येण्याची शक्यता आहे. संततीच्या आरोग्याची काळजी घ्या.कुटुंबातील वरिष्ठ सदस्यांच्या प्रकृतीवर आर्थिक खर्चात वाढ होईल.

मीन – आपल्या कामात बुद्धी चातुर्याचा उपयोग केल्यास फायदा होईल. स्त्रींयासोबत सन्मानानं आदरभावयुक्त व्यवहार ठेवावेत. मानी आणि अहंकारी वृत्तीचा मात्र वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या. आज यश निश्चित लागेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना नक्की मांडा. आपल्याला सहकार्य लाभणार आहे. व्यापारीवर्गाकरिता आकस्मिक धनलाभ होईल. गृहस्थी सौख्य लाभेल. जोडीदाराकडून सहकार्य लाभेल. प्रेमसंबंधात स्नेह वाढेल. मनाला समाधान लाभेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!