अहमदनगर,दि.४ फेब्रुवारी,(प्रतिनिधी) – सावित्री उत्सवाच्या निमित्ताने जिज्ञासा अकादमी व विचारधाराच्या संस्थेच्या वतीने बालगोपालांसाठी राज्यस्तरीय “अर्ध कथा पारंपरिक – अर्ध कथा आधुनिक स्पर्धा” अशी अर्धकथा स्पर्धा आयोजित केल्याची माहिती स्वागताध्यक्ष व भैरवनाथ कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्सचे संचालक, उद्योजक अनिल जावळे, अध्यक्ष विठ्ठल बुलबुले स्पर्धा प्रमुख संगीता गाडेकर यांनी दिली.
ही स्पर्धा इयत्ता नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना आजी आजोबा, आईबाबा, शाळेतील शिक्षक असे अनेकजण गोष्टी सांगतात. त्यात अनेक पारंपरिक गोष्टी असतात. त्या पारंपरिक अर्ध्या कथांना विद्यार्थ्यांनी तुमच्या स्टाईलमध्ये, आधुनिक जोड देवून ती कथा पूर्ण करायची आहे.
विद्यार्थ्यांनी कल्पकतेने अर्धी कथा पूर्ण करायला तुम्ही तुमच्या ताई दादा, आई बाबा, मामा मामी, सर, मॅडम अशा सर्वांची मदत घेवू शकता. तुमच्यातही एक कवी, कथाकार, साहित्यिक आणि खूप छान छान कल्पना करणारा एक सवंगडी लपलेला आहे त्याला जागे करा आणि मस्त आधुनिक अर्धी कथा लिहून पाठवा आणि बक्षीस मिळवा.
आमची पारंपारिक अर्ध कथा –
‘एक चिमणी असते, एक कावळा असतो. चिमणीचे घर मेणाचे असते, कावळ्याचे घर शेणाचे असते. एक दिवस खूप पाऊस येतो, आणि कावळ्याचे घर वाहून जाते…..
आता लिहा यापुढची … तुमची आधुनिक अर्ध कथा. या कथेच्या पुढची कथा तुम्हाला लिहायची आहे. परंतु पारंपरिक लिहायची नाही. आधुनिक लिहायची आहे.
या स्पर्धेसाठी सूचना नियम अटी खालील प्रमाणे असणार आहेत.
१) ही स्पर्धा ९ वी पर्यंतच्या सर्व मुलांमुलींसाठी खुली आहे.
२) वरील अर्ध कथा आधुनिक पद्धतीने, कल्पकतेने पूर्ण करा.
३) पारंपरिक कथा लिहिली तर स्पर्धेतून बाद केले जाईल.
४) कागदाच्या एकाबाजूने कथा लिहा.
५) कथा दि. २१ / २/ २०२३ रोजी रात्री ८ वाजेपर्यंत पोहचली पाहिजे, त्यानंतर येणाऱ्या कथा स्वीकारल्या जाणार नाही.
६) प्रथम बक्षीस ५००/- रुपये रोख व स्मृतीचिन्ह द्वितीय ३०० /- रुपये रोख व स्मृतीचिन्ह, तृतीय २००/- रुपये रोख व स्मृतीचिन्ह आणि उत्तेजानार्थ १००/- चे पाच बक्षिसे आणि प्रमाणपत्र असे बक्षिसाचे स्वरूप आहे.
७) सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकास सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
८) अहमदनगर मधील विद्यार्थ्यांनी विझार्ड कॉम्प्यूटर सेंटर, प्रोफेसर चौक, रुचिरा स्वीटच्यावर अहमदनगर
आणून द्यावे. ( संपर्क – ९७६३७१५७२२ )
९) अहमदनगर शहराच्या बाहेरील विद्यार्थ्यांनी पालकांच्या मदतीने या ९०१११९९४४२ या व्हाट्सएप नंबरवर कथा पाठवावी.
१०) नाव, शाळेचे नाव, इयत्ता, संपर्क नंबर व्यवस्थित लिहा.
११) स्पर्धेसाठी कोणतीही प्रवेश फी नाही.
स्पर्धेतील निवडक आधुनिक अर्ध कथांचे फोटो सह पुस्तक प्रकाशन करणार असल्याचे संयोजकाने जाहीर केले आहे. विद्यार्थ्यांनी अधिकाधिक सुंदर कल्पक आधुनिक अर्ध कथा लिहा आणि बाल साहित्यिक व्हावे असे आवाहन श्रीकांत वंगारी, नंदाताई माडगे, सुरेखा घोलप, कल्पना बुलबुले, प्रकाश कोटा, श्रीनिवास बुलबुले, तारिक शेख, सविता कोटा, वर्षा वंगारी, राजेंद्र बुलबुले आदींनी केले.