Homeदेश-विदेशअमेरिका हादरली; २ दिवस गोळीबारात ९ ठार

अमेरिका हादरली; २ दिवस गोळीबारात ९ ठार

न्यूयॉर्क,दि.२४ जानेवारी,(ऑनलाईन प्रतिनिधी) – शाळेत गोळीबाराच्या घटनेने अमेरिका पुन्हा हादरली आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये दोन दिवसांत गोळीबाराच्या दोन मोठ्या घटना समोर आल्या आहेत. सोमवारी संध्याकाळी हाफ मून बे भागात गोळीबाराची घटना घडली, या घटनेत ७ ठार झाले.

आयोवा राज्यात झालेल्या गोळीबारात दोघांना जीव गमवावा लागला, एक जखमी झाला. हाफ मून बे परिसरातील घटनेत एकाला अटक केली आहे. आयोवा राज्यातील डेस मोइनेस येथील शाळेत झालेल्या गोळीबारात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत एक शिक्षक जखमी झाला असल्याची माहिती मिळाली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!