धुळे, २४ जानेवारी २०२३–
धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे तापी नदी पुलावर अपघातानंतर ट्रक थेट नदीपात्रात कोसळला आहे. बारा तास उलटून गेले असले तरीही ट्रकचा अद्याप सापडलेला नाही. मात्र बुडालेल्या ट्रक संदर्भात महत्त्वपूर्ण कागदपत्र पोलिसांच्या हाती लागले आहे.
ट्रकचालकाचे नाव दीपक कुमार (वय 40) असून तो राजस्थानच्या कोटा येथील आहे. ट्रक चालकाचे ड्रायव्हिंग लायसन्स पोलिसांच्या हाती लागले आहे.
अपघातानंतर पुलाचा कठडा तोडून ट्रक नदीपात्रात कोसळला. बुडालेला ट्रक अद्यापही नदीपात्रातच आहे.यामध्ये ट्रक चालकासह आणखी किती जण आहेत याचा अद्यापही अंदाज लागू शकलेला नाही.