नेवासा,दि.२२ जानेवारी,(प्रतिनिधी) – एकेकाळी गडाख आणि घुले परिवाराचा राजकीय संघर्ष होता. मात्र आता हे दोनही नेते व्याही होणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा नगर जिल्ह्यात नवीन राजकीय सोयरिक तयार होणार आहे. या आधी अहमदनगर जिल्हात सोयऱ्या धायऱ्यांचे राजकारण पाहायला मिळालं. गावामध्ये दोन कुटुंबामध्ये संघर्ष आणि शेवटी मंगलकार्यामुळे शेवट गोड होणे, एखाद्या सिनेमाला शोभावी अशी घटना नगर जिल्ह्यातील राजकारणामध्ये आज पाहायला मिळाली.
शिवसेनेचे माजी राज्यमंत्री शंकरराव गडाख यांचे चिरंजीव उदयन गडाख आणि चंद्रशेखर घुले यांच्या कन्या डॉ.निवेदिता घुले यांचा विवाह सोहळा नेवासा तालुक्यातील सोनई येथे पार पडत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, रणजित सिंग मोहिते पाटील, आ.अशोक बापू पवार, आ.आशुतोष काळे, आ.मोनिका राजळे आदिंसह राज्यातील प्रमुख नेते मान्यवर या विवाह सोहळ्यास उपस्थित आहेत.
आता पुन्हा या नवीन सोयरिकी नंतर जिल्ह्यातील राजकीय गणिते बदलणार आहेत. गडाख आणि घुले कुटुंबांचे शेजारी शेजारी साखर कारखाने आहेत. त्यामुळे स्थानिक निवडणुकीत आमनेसामने आले होते. स्थानिक निवडणुकीत एकमेकांसमोर लढणारी दोन घराणी आज नातेसंबंधात बांधली जात असल्याने भविष्यातील राजकारण बदललणार आहे. शेजारी शेजारी साखर कारखाने आहेत. अनेकदा आमदारकी विरोधात लढवत होते. मतदारसंघ पुनर्रचनेत घुलेंचा मतदारसंघ गडाखांच्या आणी पाथर्डी शेवगाव मतदारसंघात विलीन झाला. स्थानिक निवडणूकीत एकमेकांसमोर लढणारी दोन घराणी आज नातेसंबंधात बाधली जात असल्याने भविष्यातील राजकारण बदललणार आहे