Homeक्राईमशेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीच्या बहाण्याने ५० लाखांची फसवणूक

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीच्या बहाण्याने ५० लाखांची फसवणूक

अहमदनगर,दि.२२ जानेवारी, (प्रतिनिधी) – शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीच्या नावाखाली पन्नास लाख ६३ हजारांनी गंडा घालणार्‍या सायबर चोरट्याच्या पोलिसांनी गुजरातमधून मुसक्या आवळल्या. ऑक्टोबर महिन्यात सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सायबर पोलिसांनी पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा छडा लावला.  रौनककुमार रमेशभाई परमार (वय २८, रा.मु.पो.कुवासनाता, विसनगर, जि.मेहसाना, गुजरात) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करून नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तक्रारदार यांची फसवणूक झाली होती.

तक्रारदार यांना चार मोबाईल नंबरवरून गुंतवणूक करण्यासाठी फोन कॉल आले होते. तक्रारदार यांचा विश्वास संपादन करुन आरोपींनी 50 लाख 63 हजारांनी फसवणूक केली होती. शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली नफा मिळवून देण्याचे अमिष देवून फसवणुकीचे प्रकार वाढले आहे. हे गुन्हेगार मेहसाणा, सुरत (गुजरात), इंदौर (मध्य प्रदेश) येथे सक्रिय असून त्यांनी अनेकांची ऑनलाईन फसवणूक केली आहे. फसवणूक करणारे सायबर चोरटे गुजरात मधील मेहसाना जिल्ह्यातील असल्याची खात्री पोलिसांना झाल्यानंतर एक पथक आरोपींच्या शोधासाठी पाठविण्यात आले होते. सायबर पोलिसाचे पथक सलग तीन दिवस आरोपीच्या शोधासाठी गुजरातमध्ये तळ ठोकून होते.

पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रतिक कोळी, हेड कॉन्स्टेबल योगेश गोसावी, उमेश खेडकर, राहुल हुसळे, दिंगवर कारखेले, मललिक्कार्जुन बनकर, निलेश कारखेले, अरूण सांगळे आदीच्या पथकाने ही कारवाई केली. स्वतःची ओळख व ठिकाण वेळोवेळी बदलून पोलिसांना गुंगारा देत असतानाच एका आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!