Homeनगर जिल्हाATM फोडने सुरू होते, चोरांचा प्लॅन यशस्वी होत आला अन्,.... संगमनेरमध्ये नेमकं...

ATM फोडने सुरू होते, चोरांचा प्लॅन यशस्वी होत आला अन्,…. संगमनेरमध्ये नेमकं काय घडलं?

संगमनेर, २१ जानेवारी २०२३ –

दोन चोरट्यांनी महाराष्ट्र बँकेचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला. पण तो अयशस्वी झाला ही घटना शहरातील जाणतानगर परिसरात संगमनेर येथे काल रात्री घडली आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून यातील एका चोरट्यास पकडले असून दुसरा चोरटा पळून गेला आहे. शहरातील जाणता राजा मैदान जवळील मालपाणी हॉस्पीटल जवळ महाराष्ट्र बँकेची शाखा आहे. बँकेशेजारी असलेले या बँकेचे एटीएम हे 24 तास चालु असते. शुक्रवारी बँकेचे कामकाज आटोपून सर्व कर्मचारी आपापल्या घरी गेले.

बँकेचे असिस्टंट मॅनेजर अक्षय जवरे हे झोपेत असतांना ए. एन. जी. कंपनीचा एटीएम सेक्युटरी मोबाईल नंबर वरून त्यांना एटीएम फोडण्याचा प्रयत्न चालु आहे असा फोन आला. यानंतर ते त्वरित बँकेसमोर पोहोचले.पोलिसांनाही सुरक्षा नंबर वरून फोन केल्याने पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. या ठिकाणी पोलीस नाईक विवेक जाधव यांनी एका चोरट्याला पकडले आहे. मात्र दुसर्‍या चोरट्याने जाधव यांना धक्काबुक्की करुन पळ काढला आहे. हे घडत असतांना पोलीस नाईक सचिन उगले, पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल पवार हे दोघे घटनास्थळी पोहचले आहे. पोलिसांनी एटीएममध्ये घुसलेल्या दोन चोरट्यांपैकी मशिनचा दरवाजा फोडीत असतांना एका चोरट्यास जागीच पकडले. यावेळी एटीएम मशिनचा पत्रा उचकुन त्याचा हँन्डेल तुटलेला दिसला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!