हेल्थ, २१ जानेवारी २०२३ –
डोळा हा मानवी अंगातील सर्वात नाजूक आणि महत्वाचा भाग आहे. शरीर सुदृढ होण्यासाठी जिम आणि योगा या मार्गाचा उपयोग केला जातो. ज्यामुळे संपूर्ण शरीर निरोगी राहते. पण डोळयांकडे मात्र दुर्लक्ष होते. डोळ्यांची काळजी घेतली जात नाही नकळत आपल्याकडून दररोज डोळ्याला इजा होते. याचा परिणाम पुढे कायमची दृष्टी जाऊ शकते. डोळ्यांमूळ जगातील सौंदर्य पाहायला मिळते. ५ जीच्या काळात मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही , कॉम्प्युटर इतर इलेक्ट्रॉनिक साधनाच वापर अति प्रमाणत होत आहे.
यामुळे डोळे दुखणे, डोके दुखणे, डोळ्यांतून पाणी येणे आणि अस्पष्ट दिसणे. रोजच्या आपल्या काही सवयी मुळे आपल्या डोळ्याला भरपूर त्रास होतो. यावर वेळेत लक्ष न दिल्यास आपली दृष्टी जाऊ शकते. तर जाणून घेऊ या कोणत्या चुका आहेत.
१. डोळे गरम पाण्याने धूणे –
काहींना असे वाटते की गरम पाण्याने डोळे धुतल्याने स्पष्ट दिसेल. हे साफ चूक आहे .या मुळे तुम्ही डोळ्यांना इजा पोहचत आहे. डोळे नेहमी थंड व साधारण पाण्याने धुतले पाहिजे.
२. पापण्या न मिचकावणे –
काही लोक पापण्या न मिचकावता सतत टीव्ही व मोबाईलकडे टक लावून बघत असतात. एक्स्पर्ट नुसार डोळे मिचकावल्यामुळे डोळे तर निरोगी राहतात त्याच बरोबर तणाव देखील कमी होतो.3.
३.डोळे चोळणे –
डोळे चोळणे ही सवयी लहान मुलाबरोबर सर्वानाच असतो. हे खूप गंभीर इजा होते कारण डोळा वर पातळ परत असते. तिचे काम डोळ्याचे रक्षण करणे असते.
४. आय मास्कचा वापर –
भरपूर लोक रात्री आय मास्क लावून जोपतात. त्यामुळे त्यांना फायदा देखील झाला आहे पण या मुळे दीर्घ काळ फायदा होणार असे नाही . एक्स्पर्ट चा मते डोळे मास्क किंवा अन्य असणेही झाकून ठेवल्यास पेक्षा ते उखडे च जास्त फायदेशीर असेल.