Homeराशीभविष्यआजचे राशिभविष्य (दिनांक २१ जानेवारी २०२३)

आजचे राशिभविष्य (दिनांक २१ जानेवारी २०२३)

जाणून घ्या आज शनिवार दिनांक २१ जानेवारी २०२३ रोजीचे आपले राशिभविष्य

मेष – गुरूबल उत्तम असल्याने आध्यात्मिक,धर्माविषयी विशेष आस्था निर्माण होईल. तीर्थयात्रा, तिर्थक्षेत्री प्रवासाचा योग आहे. वडिलोपार्जित इस्टेटीतून वारसाहक्कातुन धनलाभ संभवतो. बौध्दिक, शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना मान सन्मान मिळेल. पदप्रतिष्ठा प्राप्त होईल.लेखन प्रकाशित होईल. स्पर्धापरिक्षेत यश संपादन होईल.आधुनिक वस्तुंचा लाभ होईल. व्यापारात जुनी येणी वसूल होतील. बँकेत व्यवहार करताना जपून करावा.मुलांकडून समाधान लाभेल. सकारात्मकेचे परिणाम दिसतील. आपल्या इच्छेप्रमाणे कार्य घडतील. मित्रमैत्रिणींमधील वादविवाद संपुष्टात येतील.

वृषभ – आज मनोबल उंचावेल. व्यवहार चातुर्य आणि संयमी भुमिका घेतली तर मोठा आर्थिक लाभ होईल. नोकरीत आपल्या कामाप्रती सजग राहा. आळस दुर ठेवा. व्यापारात आर्थिक लाभ घडतील. नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. नातेवाईक,आप्तेष्टा कडून सहकार्य लाभेल. कुटुंबात मंगलकार्याची रूपरेखा आखली जाईल. मार्ग मोकळे होतील. फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे.कुंटूंबातील वयस्कर व्यक्तींच्या प्रकृतीची काळजी घ्या. आरोग्य उत्तम राहिल.

मिथुन – अत्यंत शुभ दिनमान आहे. आपल्या कार्यक्षेत्रात पूर्ण क्षमतेने कर्तुत्वाला साजेसे कार्य कराल.धाडसी निर्णय घ्याल. कुटुंबातील सदस्याचे सहकार्य घ्या.व्यापारात अती उत्साहीपणाने निर्णय घेऊ नका. धनलाभाचा योग आहे. भांवडाकडून आर्थिक सहकार्य लाभेल. कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीसी मधुर संबंध राहतील. बौद्धिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मंडळीना उत्तम दिनमान आहे. विदयार्थ्यांनी विद्याभ्यासात लक्ष दयावे.आरोग्याच्या थोडयाफार समस्या उद्भभवतील.पोटाच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नये.

कर्क – शनिच्या नक्षत्रातील चंद्रभ्रमणात अडचणीत आणणारा दिवस आहे. नोकरीत अतिउत्साही आणि अतिरक पणा टाळा. मानसिक स्वास्थ सांभाळा. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. साकारात्मक दृष्टीकोन ठेवून वाटचाल करावी. अनिश्चिततेमुळे वैचारिक धाडसामध्ये कमतरता येईल. व्यापारात कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते. कर्जप्रकरणात काळजीपूर्वक व्यवहार करा.भावनावर नियंत्रण ठेवा. कौटुंबिक समस्याकडे लक्ष राहणार नाही. पत्नीच्या प्रकृतीची चिंता सतावु शकते.आरोग्याबाबतीत खर्चात वाढ होईल. अनपेक्षित खर्च वाढण्याची शक्यता आहे.

सिंह – कार्यक्षेत्रात उर्जा कमी राहिल. भांडण, वादविवादामुळे मानसिक त्रास वाढेल. मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न ठेवा. पारिवारिक सहकार्य लाभणार नाही. नातेसंबंधाविषयी मनात कटुता, तिरस्कार निर्माण होण्याची शक्यता आहे. व्यापार रोजगातात काही अडचणीचा सामना करावा लागू शकतो. दुरवरचे प्रवास शक्यतो टाळा. अर्थप्राप्तीत अडथळे निर्माण होतील. आशावादी दृष्टीकोनातून सतत विचार करावा. आरोग्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नये.

कन्या – आपल्या कार्यक्षेत्रात यश संपादन कराल. नोकरीतील बदल मोठे फायदेशीर ठरतील. आत्मविश्वासात वाढ होवून मन प्रसन्न राहील. कौटुंबिक समस्या आणि स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील. समाजात मानसन्मान प्रतिष्ठा मिळाल्याने आनंदी राहाल. मत्सर संवाद टाळावा. कोणाचाही द्वेष करू नका.व्यापार उद्योगात वाढ होईल. भागीदारांकडून उत्तम सहकार्य लाभेल. पत्नीसोबत गोडी व दुरावा असे दोही फळे अनुभवास येतील. परदेशगमन व दुरचे प्रवास घडणार आहे.

तूळ – आजचं चंद्रनक्षत्र भ्रमणात आपल्या दिवस सफलतापूर्वक व्यतीत कराल.कार्यक्षेत्रात योग्यवेळी घेतलेला निर्णय फायदेशीर राहिल. नोकरीत नवीन योजनेवर केलेले प्रयत्न सफल होतील. वरिष्ठांकडून केलेल्या कामासाठी दाद मिळेल. हातुन निसटलेल्या संधी पुन्हा प्राप्त होतील. राजकीय,सामाजिक कार्यातील व्यक्तींना मोठे पद, मानसन्मान, प्रसिद्धी मिळेल. सल्लागार, प्रोफेसर यांच्यासाठी शुभदिवस आहे. व्यापारात काही नवीन योजना पूर्णत्वास जातील. मित्रमंडळींचे व कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभणार आहे. आरोग्य उत्तम साहिल.

वृश्चिक – नोकरी रोजगारात वेळेचे नियोजन उत्तम कराल. आपल्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामकाजाला सुरुवात करा. निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. व्यापारात कामकाजामध्ये वाढ विस्तार होईल. योग्यवेळी घेतलेल्या निर्णयाचा फायदा होईल. साहित्य,कला क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक लाभ व मानसन्मान मिळेल. आनंदाची बातमी ऐकायला मिळेल.वैवाहिक सुखात वाढ होईल.मुलांकडुन समाधान मिळेल. आत्मविश्वास द्विगुणित करणारे दिनमान आहे.स्वभावातील लहरी व हट्टीपणा टाळा. आहारावर नियंत्रण ठेवा.

धनु – फायदा, नुकसानीच्या घटना घडतील. विद्यार्थ्यांना अनुकुल दिवस आहे. विद्याभ्यासात प्रगती होईल. वाचन, मनानाची गोडी वाढेल. कंटूंबातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा. मन समाधानी राहील. नोकरीत अतिरिक्त कामाचा ताण जाणवेल. वरिष्ठांशी वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे. व्यापारानिमित्त प्रवास होईल. हानी होण्याची शक्यताआहे. कुटुंबात मतभेद संभवतात. मन अस्थिर राहील. स्वभावातील चंचलतेवर नियंत्रण ठेवा. आरोग्याबाबतीत विशेष काळजी घ्या. अपघात,इजा होण्याची शक्यता आहे.

मकर – प्रलंबित कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे, गुरुजनांचे उत्तम मार्गदर्शन मिळेल. नोकरी व्यापारात वाढ करणारा दिवस राहिल.लेखन, साहित्य क्षेत्रातील व्यक्तींना राजाश्रय लाभेल. मान-सम्मान वाढेल. नोकरीत अचानक बदल घडतील. वाहन, घर खरेदीचा योग आहे. संशोधन क्षेत्रातील मंडळीना मान सन्मान पदवी,पुरस्कार मिळेल. व्यापारात आर्थिक गुंतवणूक मोठया प्रमाणात राहिल. आर्थिक उलाढालीतून फायदा होईल.वाढविवाद मात्र टाळावे. पत्नींच्या प्रकृतीची काळजी घ्या.

कुंभ – नावलौकिकतेला यशाचाही जोड आज मिळणार आहे.शनिबदलामुळे प्रयत्नांना यश लाभेल. आजचे प्रयत्न सफलदायक ठरतील. शिक्षणामध्ये अपेक्षेप्रमाणे प्रगती होईल. व्यापारात भागीदारीत अपेक्षित लाभ होईल. नोकरीमध्ये अनुकुल बदल होईल. शत्रुवर मात कराल. कोर्टकचेरीच्या कामास गती मिळेल. विवाहइच्छुकांचे विवाह जुळतील. कौटुंबिक पातळीवर वातावरण चांगले राहिल. व्यापार रोजगारात अनुकूल अशी सफलता मिळेल. संततीकडून आनंदाची बातमी कळेल. शेअर्समध्ये दीर्घकालिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कुटुंबातील वरिष्ठ सदस्यांच्या आरोग्याबाबतीत काळजी घ्या. खर्चात वाढ होईल.

मीन – मनावर नियंत्रण ठेवून संयम राखावा. आपल्या स्वभावात चंचलता, चिडचिडपणा निर्माण होईल. दुर्घटना,गंभीर दुखापतीची शक्यता आहे. आजार उद्भभवतील. मानसिक उत्तेजना व विद्रोह वाढेल. नोकरीत अत्यंत सावधानीपूर्वक वाटचाल ठेवावी. निराशाजनक परिणाम येण्याची शक्यता आहे. व्यापार रोजगारात मोठे निर्णय घेऊ नयेत. भागीदारासोबत वादविवाद टाळा. व्यावसायिक योजना गुप्त ठेवा. देण्याघेण्याच्या व्यवहारात सावधपणा ठेवा. संतताबाबतीत काळजी वाटेल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!