मुंबई,दि.१९ जानेवारी – अभिनेत्री राखी सावंतला आंबोली पोलिसांनी अटक केल्याची बातमी समोर येत आहे. अभिनेत्री शर्लिन चोप्राने ट्विटरवर ही माहिती दिली आहे. आज दुपारी राखी सावंत तिचा पती आदिलसोबत तिची डान्स अकादमी सुरू करणार होती, त्यापूर्वीच पोलिसांनी तिला शर्लिन चोप्रा प्रकरणात अटक केली आहे.
नोव्हेंबर 2022 मध्ये शर्लिन चोप्राने राखी सावंत विरोधात तक्रार दाखल केली होती आणि तिने पत्रकार परिषदेत तिचा अश्लील व्हिडिओ दाखवताना असभ्य भाषा वापरल्याचा आरोप केला होता.
शर्लिन चोप्राने ट्विटरवर ट्वीट करत म्हटले आहे की, ताजी बातमी!!! आंबोली पोलिसांनी FIR 883/2022 प्रकरणी राखी सावंतला अटक केली आहे. मुंबईच्या सत्र न्यायालयाने कालच राखी सावंतचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता, त्यानंतर आज तिला ताब्यात घेण्यात आलं आहे.