मुंबई, १६ जानेवारी २०२३ –
राखी सावंत ड्रामा क्वीन आहे. राखी जेव्ह कॅमेरासमोर येते तेव्हा धमाका करत असते सध्या राखीच्या आयुष्यात धमाका झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून राखीचे रडतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होते. त्याचे कारण आदिल आणि राखीचे लग्न. आदिलने यावर आता पूर्णविराम लावला आहे. आदिलने आता त्यांचे लग्न कबूल केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून राखी सावंतचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होते. या व्हिडिओमध्ये राखी मुसमुसून रडताना दिसत होती. राखी आणि आदिलच्या लग्नच फोटो व्हायरल झाल्यापासून राखी त्रासात असल्याचे दिसत होते. राखीने त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर करून तिने आदिलशी सिक्रेट वेडिंग केल्याचे सांगितले होते. परंतु आदिलकडून यावर कोणतेही स्पष्टीकरण आले नव्हते. तसेच त्याने यावर बोलण्यासाठी वेळ देखील मागितला होता.
राखी-आदिलच्या लग्नाचा सस्पेन्स आता संपला आहे. आदिलने सोशल मीडियावर पोस्ट करून त्याच्या लग्नाचा स्वीकार केला आहे. आदिलने त्याच्या आणि राखीच्या लग्नाचा फोटो त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे आहे की, अखेर मी अधिकृतरित्या जाहीर करत आहे. मी कधीच असे म्हटले नाही की, ‘मी तुझ्याशी लग्न केले नाही राखी. परंतु मला काही गोष्टी हॅन्डल करायच्या होत्या, त्यामुळे मला गप्प राहावे लागलं. आपल्या दोघांना या सुखी लग्नाच्या शुभेच्छा. तसेच आदिलने राखीला प्रेमाने पाप्पुडी म्हटले आहे.
आदिलच्या या पोस्ट राखी लगेच प्रतिक्रिया दिली आहे. तिने लिहिले आहे की, धन्यवाद जान, खूप खूप प्रेम. अनेक सेलिब्रिटी देखील राखी-आदिलला लग्नाच्या शुभेच्छा देत आहेत. तसेच त्यांचे फॅन्स देखील त्यांचे अभिनंदन करत आहेत.
राखी आणि आदिल यांचे लग्न ७ महिन्यांपूर्वी झाले होते. राखी ‘बिग बॉस मराठी ४’मध्ये गेल्यानंतर आदिलचे दुसऱ्या कोण्यासोबत तरी अफेअर सुरू झाले होते. त्यामुळे राखीने त्यांच्या लग्नाचे फोटो सर्वांसमोर आणले आहे. परंतु आदिल यावर काहीही बोलण्यास तयार नव्हता. आदिलशी लग्न कारण्यासाटःई राखीने धर्म परिवर्तन केले आहोत. तसेच राखी हे नाव बदलून फातिमा केले आहे.
राखी आणि आदिल दुबईतील एका इव्हेंटमध्ये एकत्र सहभागी झाले होते. त्यानंतर राखीचे रडतानाचे व्हिडिओ पाहून सगळेच हैराण झाले होते. आदिलच्या या कबुलीनंतर आता त्यांचे नाते सुरळीत होईल अशी अपेक्षा आहे.