नागपूर,दि.१४ जानेवारी – राज्याच्या राजकारणातून सध्या एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील कार्यालयात हे कॉल आले आहे. या बातमीनंतर मोठी खळबळ माजली असून पोलिसांनी तात्काळ मंत्री नितीन गडकरी यांच्या सुरक्षेत मोठी वाढ केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील कार्यालयात तब्बल तीन वेळा धमकीचे कॉल आल्याची बातमी समोर आली आहे. सकाळी ११, साडेअकरा आणि पुन्हा बारा वाजता हे कॉल आले.
कॉलमध्ये दाऊदच्या आवाजात त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे. या धक्कादायक बातमीनंतर नितीन गडकरी यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांच्या नागपूरमधील निवासस्थानीही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.