हैद्राबाद,दि.१३ जानेवारी, – अन्नपदार्थाचं पार्सल घेऊन गिऱ्हाइकाच्या घरी गेलेल्या डिलिव्हरी बॉयसोबत भयंकर घटना घडली आहे. पाळीव कुत्रा अंगावर भुंकू लागल्याने जिवाच्या भीतीने डिलिव्हरी बॉयनं इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली यात तो गंभीर जखमी झाला आहे .
मोहम्मद रिझवान असे या स्विगी डिलिव्हरी बॉयचं नाव आहे.
अन्नपदार्थाचं पार्सल घेऊन गिऱ्हाइकाच्या घरी गेलेल्या डिलिव्हरी बॉयसोबत भयंकर घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिलिव्हरी बॉय बंजारा हिल्स येथील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर पार्सल घेऊन गेला होता. त्याने फ्लॅटचा दरवाजा ठोठावला. दरवाजा उघडल्यानंतर आत असलेला कुत्रा त्याच्यावर भुंकायला लागला. त्याच्या अंगावर धावेल अशी भीती वाटल्याने डिलिव्हरी बॉयने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली.
यात तो गंभीर जखमी झाला. फ्लॅटच्या मालकाने रुग्णवाहिका बोलावून घेतली. त्याला तातडीने निजाम इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या हॉस्पिटलमध्ये पोहोचवले आहे.
२३ वर्षीय फूड डिलिव्हरी बॉय रिझवान हा श्रीरामनगर येथे राहतो. त्याची प्रकृती अद्याप चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. रिझवानच्या भावानं या प्रकरणी बंजारा हिल्स पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात तक्रार दिली असून, कारवाईची मागणी केली आहे.