मुंबई,दि.१३ जानेवारी,(ऑनलाईन प्रतिनिधी) – नाशिक पदवीधर निवडणुकीत काल जे राजकीय नाट्य अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. त्याचे पडद्यामागील सूत्रधार देवेंद्र फडणवीस असल्याची चर्चा होतेय. सत्यजित तांबे यांच्या उमेदवारी आणि संपूर्ण घटनाक्रमाबाबत देवेंद्र फडणवसीसांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ असे सूचक वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
आमचं जे काही धोरण आहे, ते भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल स्पष्ट केलं आहे. याबाबत जो काही निर्णय आहे तो योग्य वेळी घेऊ. सत्यजित तांबे युवा नेता आहे. त्यांच कामही चांगले आहे. मात्र राजकीय निर्णय धोरणांप्रमाणे घ्यावे लागतात. त्यासाठी वेळ द्यावा लागतो. म्हणून योग्य वेळी योग्य निर्णय चंद्रशेखर बावनकुळे घेतीत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे.
सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीबाबत काल जे काही झाले त्यात आमची काहीही भुमिका नाही. सत्यजित तांबे यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला गेलो होते. मात्र राजकारणात एकमेकांच्या कार्यक्रमात जाणं यात काही नवीन नाही, असंही फडणवीस म्हणाले आहे.
नाशिक पदवीधर निवडणुकीतील घटनाक्रम तुम्हाला वाटतो तसा नाही. योग्य वेळी सर्व गोष्टी समोर येतील.राजेंद्र विखे यांनी याठिकाणी उमेदवारी घ्यावी अशी आमची इच्छा होती. मात्र त्यांनी काही कारणास्तव असमर्थता दाखवली. त्यानंतरही राधाकृष्ण विखे पाटलांशी आमची चर्चा सुरु होती. अन्यथा त्यांचा उमेदवारी देणे आमच्या डोक्यात होते, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.