Homeनगर जिल्हाजामखेडमध्ये साकारले राजमाता जिजाऊंचे जगातील सर्वांत मोठे रेखाचित्र

जामखेडमध्ये साकारले राजमाता जिजाऊंचे जगातील सर्वांत मोठे रेखाचित्र

जामखेड, दि.१२ जानेवारी,(प्रतिनिधी) – राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंतीचे औचित्य साधून जामखेडमधील नागेश विद्यालयाच्या मैदानावर १५ हजार स्क्वेअर फूटमध्ये जगातील सर्वात मोठे राजमाता जिजाऊ यांचे रेखाचित्र तयार केले आहे. चित्रकार उद्देश पघळ यांनी हे चित्र साकारले असून श्री. नागेश विद्यालयाचे कलाशिक्षक मयूर भोसले आणि एनसीसी कॅडेट यांनी हे चित्र तयार करण्यासाठी विशेष सहकार्य केले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अवघ्या चार दिवसात हे रेखाचित्र पूर्ण झाले आहे.

१२ जानेवारी रोजी जिजाऊ माँ साहेब यांची जयंती मोठ्या उत्साहात संपूर्ण राज्यभर साजरी केली जाते. त्यांना अनोखी आदरांजली देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे. ज्याची नोंद जागतिक पातळीवरील विक्रमांमध्येही केली जात आहे. माँ साहेबांचे चित्र साकारण्यासाठी किल्ले बांधणीसाठी वापरण्यात येणाऱ्या बेसॉल्ट खडकाच्या दगडाचा वापर करण्यात आला असून पांढरा व काळ्या चुन्याचा रंगवण्यासाठी वापर केलेला आहे.

राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना अनोखी आदरांजली देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आलाय. ज्याची नोंद जागतिक पातळीवरील विक्रमांमध्ये देखील केली जात आहे. हे चित्र साकारण्यासाठी किल्ले बांधणीसाठी वापरण्यात येणाऱ्या बेसॉल्ट खडकाच्या दगडाचा वापर करण्यात आलाय. पांढरा आणि काळ्या चुन्याचा रंगवण्यासाठी वापर देखील करण्यात आलाय. २१ ब्रास मोठी खडी, ३० गोण्या पांढरा चुना आणि २२ गोण्या काळा चुना वापरण्यात आला आहे. आज या रेखाचित्राचे उद्घाटन पार पडणार असून त्यानंतर ते सर्वसामान्यांना बघण्यासाठी खुले करण्यात येणार आहे. ३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अशाच पद्धतीने रेखाचित्र काढले जाणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!