विविध उत्पादनाच्या खरेदीसाठी महिलांची अलोट गर्दी
अहमदनगर,दि.१० जानेवारी,(प्रतिनिधी) – सेवाप्रीत मधील महिलांच्या समाजकार्याला सलाम आहे. कोरोना काळात गंभीर परिस्थिती असताना महिलांनी घराबाहेर पडून, गरजूंना मदत केली. सातत्याने गरजू विद्यार्थ्यांना आधार देण्याचे काम ते करत आहे. सक्षम पिढी घडविण्यासाठी त्यांचे योगदान प्रेरणादायी असल्याचे बाल न्याय मंडळाच्या सदस्या अॅड. ममता नंदनवार यांनी केले. महिलांच्या सक्षमीकरणासाठी व अनाथ विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आनण्याच्या उद्देशाने सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या वतीने टिळक रोड येथील नंदनवन लॉनमध्ये घेतलेल्या उमंग २०२३ फेस्ट सिझन टू च्या समारोपप्रसंगी अॅड. नंदनवार बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून तोफखाना पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, मुंबई येथील सामाजिक कार्यकर्त्या सिमा गुलाटी, फाऊंडेशनच्या अध्यक्षा जागृती ओबेरॉय, अर्चना खंडेलवाल, डॉ. सिमरन वधवा, गिता नय्यर, प्रकल्प प्रमुख सविता चड्डा, सुशिला मोडक, अनू थापर, रितू वधवा, गितांजली माळवदे, निशा धुप्पड, स्विटी पंजाबी आदींसह ग्रुपच्या महिला सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
पुढे अॅड. नंदनवार म्हणाल्या की, पालकांनी आपली जबाबदारी सांभाळून मुलांकडे लक्ष द्यावे. त्यांना मोबाईल पासून लांब ठेवावे. प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व विद्यार्थ्यांसमोर उभे केल्यास त्यांच्यावर संस्कार घडणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविकात जागृती ओबेरॉय यांनी २०१५ पासून सेवाप्रीत फाउंडेशन सामाजिक योगदान देत आहे. विविध क्षेत्रातील महिलांनी एकत्र येऊन सामाजिक कार्य उभे केले आहे. फाऊंडेशनच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासह वंचित, दुर्बल घटकातील व अनाथ विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विशेष कार्य केले जात असल्याचे सांगितले.
ज्योती गडकरी यांनी सेवाप्रीतच्या सामाजिक कार्याला शुभेच्छा देऊन, महिलांनी उभी केलेली सामाजिक चळवळ व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य कौतुकास्पद असल्याचे स्पष्ट केले. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या हस्ताक्षर, चित्रकला, गोष्टी सांगणे, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनविणे, फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे बक्षिस वितरण करण्यात आले. या स्पर्धांना शालेय विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
नारी शक्तीचा जागर करीत उमंग फेस्टचा कार्यक्रम रंगला होता. आमदार संग्राम जगताय यांनी या उपक्रमास भेट देऊन महिलांच्या कार्याचे कौतुक केले. सेवाप्रीतच्या डायरीचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. उमंग फेस्टमध्ये झालेल्या गिरीराज जाधव यांच्या लाईव्ह म्युझिक शो च्या कार्यक्रमात सर्व श्रोते भारावले. यावेळी विविध गीतांचा बहारदार नजराणा सादर करण्यात आला. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांना दाद दिली. महिलांनी महिलांसाठी भरविलेल्या उमंग फेस्टला उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. खाद्य पदार्थ, हस्तकला, विविध साहित्य, वस्त्रांचे स्टॉलवर खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सिमरनकौर वधवा यांनी केले. उमंग फेस्ट यशस्वी करण्यासाठी सविता चड्डा, अंचल बिंद्रा, अनू अॅबट, सोनिया अॅबट, डॉली भाटिया, अपर्ण बत्रा, छाया खर्डे, उषा ढवण, डॉली मेहेता, शिल्पा गांधी, गिता शर्मा, शितल मालू, कंचन नेहलानी, किट्टी मल्होत्रा, रुपा पंजाबी, मंगला पिडीयार, रिध्दी मेहेता, रिटा सलूजा, संगिता ओबेरॉय, कैलाश मेहेता, अनिता शर्मा, बिना बत्रा परिश्रम घेतले. या फेस्टच्या माध्यमातून जमा झालेले पैसे अनाथ विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आनण्यासाठी खर्च केले जाणार असल्याचे सेवाप्रीतच्या वतीने जाहीर करण्यात आले.