Homeराशीभविष्यआजचे राशिभविष्य (दिनांक ९ जानेवारी २०२३)

आजचे राशिभविष्य (दिनांक ९ जानेवारी २०२३)

जाणून घ्या आज सोमवार दिनांक ९ जानेवारी २०२३ आपले राशिभविष्य

मेष – भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज. तुमची भीती शक्य तितक्या लवकर घालवणेही आवश्यक. त्याचा तुमच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो.

वृषभ – नातेवाईकांकडून मिळालेल्या भेटवस्तूमुळे तुम्हाला आनंद मिळेल. प्रेमामध्ये एकतर्फी वेड, मोह तुम्हाला तीव— दु:ख देईल.

मिथुन – नव्या योजना आणि उपक्रमाबद्दल पालक कमालीचे उत्साही असतील. कामे वेळेवर पूर्ण करण्याचा तुम्हाला प्रयत्न केला पाहिजे.

कर्क – तुमच्यात ऊर्जा पाहिली जाऊ शकते. ठरलेल्या वेळेच्या आधीच काम पूर्ण करू शकता. प्रवास करणार असाल तर सामानाची काळजी घ्या.

सिंह – आपल्या आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षाना धक्का लागण्याची शक्यता. ही परिस्थिती हाताळण्यासाठी आपणास योग्य सल्ल्याची गरज.

कन्या – पूर्वीच्या दिवसांमध्ये केलेली मेहनत फळाला येईल. तुम्ही जर अधिक उदारपणे वागत असाल तर तुमच्या जवळच्या व्यक्ती गैरफायदा घेण्याची शक्यता.

तूळ – आपले मत मांडण्यास कचरू नका. तुमचा आत्मविश्वास ढळू देऊ नका. प्रगतीत अडचणी निर्माण होतील. स्वत:ला व्यक्त होऊ द्या.

वृश्चिक – नव्या संकल्पना फलद्रूप ठरतील. तुम्ही स्वतःला वेळ देणे जाणता आणि तुम्हाला बराच रिकामा वेळ मिळण्याची शक्यता.

धनु – जीवनसाथीचा आनंददायी प्रेमळ मूड तुमचा दिवस उजळून टाकेल. तुम्ही घरातील वरिष्ठ लोकांकडून पैशांची बचत करण्यासाठी काही सल्ला घेऊ शकता.

मकर – एकटेपणावर मात करता येईल. खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. महत्त्वाच्या गोष्टींचीच खरेदी करा.

कुंभ – तुम्हाला जादूई असे आशादायी वातावरण अनुभवास येईल. मिळणारे पैसे तुमचा दिवस उजळून टाकतील. ज्ञानलालसेपोटी नवीन मित्र जोडाल.

मीन – उत्साहपूर्ण नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल, त्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा संभवतो. तुम्हाला काहीतरी वेगळा अनुभव मिळणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!