Homeनगर शहरश्री अंबिका विद्यालयाचा तुपे गणेश ज्ञानदेव पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात...

श्री अंबिका विद्यालयाचा तुपे गणेश ज्ञानदेव पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात ८ वा

अहमदनगर,दि.५ जानेवारी,(प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा जुलै २०२२ चा निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये केडगाव येथील श्री अंबिका माध्यमिक व उच्च माध्यमिक विज्ञान विद्यालयातील इयत्ता पाचवीच्या ५ विद्यार्थ्यांनी तर इयत्ता आठवीच्या एका  विद्यार्थिनीने जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळविले.

विद्यालयातील इयत्ता पाचवीतील विद्यार्थी तुपे गणेश ज्ञानदेव २८४ गुण मिळवून राज्यात ८ वा तर जिल्ह्यात प्रथम, कोतकर सोहम योगेश २४८ गुण, साठे प्रणव दत्तात्रय  २४८ गुण, कु.मुनफन अनुष्का प्रकाश  २३० गुण, खाडे सुरज श्रीराम २०२ गुण, अशा पाचवीच्या एकूण ५ विद्यार्थ्यांनी  गुणवत्ता यादीत स्थान मिळविले. इयत्ता आठवीतील खाडे समृद्धी संतोष  हिने २४२ गुणांसह जिल्हा यादीत स्थान मिळविले.

या विद्यार्थ्यांना पाचवी शिष्यवृत्ती विभाग प्रमुख स्वाती औटी, संदीप गाडीलकर, बाबासाहेब जगदाळे, अशोक बडवे तसेच आठवी शिष्यवृत्ती विभाग प्रमुख कुशाभाऊ अकोलकर, रविकुमार तंटक, रोहिणी दरंदले, किसन रोहोकले यांचे मार्गदर्शन लाभले.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे विद्यालयाचे प्राचार्य तथा रयत शिक्षण संस्थेचे उत्तर  विभागीय अधिकारी तुकाराम कन्हेरकर, शिक्षण संस्थेचे माजी सचिव शिवाजीराव भोर,स्थानिक सल्लागार समिती सर्व सदस्य,पर्यवेक्षक पोपट घोडके , गुरुकुल प्रमुख कैलास आठरे व  सर्व शिक्षक शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!