महिला शिक्षिका जबाबदारीतून कधीही मागे हटल्या नाहीत -आ. संग्राम जगताप
अहमदनगर,दि.४ जानेवारी,(प्रतिनिधी) – सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षणाची चळवळ चालविताना जात, धर्म, पंथ पाहिला नाही. महिला शिक्षण हेच उदात्त ध्येय व व विचार समोर ठेऊन कार्य केले. हाच वारसा महिला शिक्षिका पुढे चालवित आहे. वैचारिक ज्ञान दिल्याने वाढते. शिक्षक नोकरीतून निवृत्त झाला तरी, त्यांचा वैचारिक वारसा निवृत्त होत नसल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. शिक्षणासह निवडणुक प्रक्रिया, शासनाच्या विविध योजनांच्या कार्याबाबत शिक्षणाचे कर्तव्य बजावून महिला शिक्षिका जबाबदारीतून कधीही मागे हटल्या नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आमदार संग्राम अरुणकाका जगताप यांच्या वतीने मंगळवारी (दि.3 जानेवारी) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 192 व्या जयंतीनिमित्त महिला शिक्षण दिवस साजरा करण्यात आला. आयुर्वेद महाविद्यालय येथे झालेल्या कार्यक्रमात शहरात शिक्षण क्षेत्रात विद्यादानाचे पवित्र कार्य करणार्या महिला शिक्षिका व प्राध्यापिकांना सावित्रीच्या लेकी पुरस्काराने आमदार जगताप यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, प्रा. मोहनराव कांजवणे, प्रा. भगवान काटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार जगताप म्हणाले की, राष्ट्रपतीच्या सर्वोच्च पदावर महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेतलेल्या एक आदिवासी समाजातील महिला विराजमान आहे. यावेळी सावित्रीबाईंची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. विविध क्षेत्रात महिला आघाडीवर असताना याचे श्रेय सावित्रीबाईच्या स्त्री शिक्षणाला जात असल्याचे त्यांनी सांगितले. तर शहरात शिक्षण क्षेत्रातील सामाजिक चळवळ प्रा. विधाते चालवत असल्याचे कौतुक करुन, शिक्षण क्षेत्रातील मोठा वर्ग राष्ट्रवादीशी जोडला गेल्याचेही ते म्हणाले.
प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविकात प्रा. माणिक विधाते यांनी शिक्षण क्षेत्रात योगदान देऊन महिला सावित्रीबाई फुले यांचा वारसा पुढे चालवित आहे. या कार्यातून भावी पिढी घडविण्यासह समाजाला प्रगतीपथाकडे घेऊन जाणार्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय व महाविद्यालयीन महिला शिक्षक, प्राध्यापकांना गौरविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
पुरस्कारार्थी महिला शिक्षक, प्राध्यापकांनी मनोगत व्यक्त करताना स्त्री सर्व समाजाचा आधारस्तंभ आहे. महिला शिक्षण व संस्काराने समाज पुढे घेऊन जात आहे. सावित्रीबाईंचा वारसा पुढे चालवण्याचे कार्य सर्व महिला शिक्षक करत आहेत. महिला शिकल्याने समाज सावरला गेला. कुटुंबातील महिला शिकल्यास कुटुंबासह समाजाची प्रगती होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर, ओबीसी सेलचे अमित खामकर, व्यापार, उद्योग सेलचे आनंद गारदे, फुले ब्रिगेडचे दीपक खेडकर, महेश आनंदकर, केडगाव अध्यक्ष भरत गारुडकर, लहू कराळे, गणेश बोरुडे, रामेश्वर कातकडे, किरण जावळे, अर्जुन चव्हाण, संतोष यादव आदी उपस्थित होते.
सावित्रीच्या लेकी पुरस्काराने या महिला शिक्षक वा प्राध्यापिकांचा झाला सन्मान –
विद्या यादव (अशोकभाऊ फिरोदिया), अनुरीता झगडे (एस.आर.इ.एफ. इंग्लिश मीडियम स्कूल), डॉ. निशात शेख (यशवंत माध्यमिक विद्यालय), कल्पना भामरे (लक्ष्मीनारायण शिशु शिक्षण मंदिर), सुनिता पाटील-काकडे (रेसिडेन्शियल विद्यालय), जयश्री दरे- कांजवणे (रेसिडेन्शिअल विद्यालय), नीता तनपुरे (प्रियदर्शनी पब्लिक स्कूल), संगीता बनकर-बोराटे (सखाराम मेहत्रे प्राथमिक विद्यालय), अपर्णा क्षीरसागर (आनंद माध्यमिक विद्यालय), स्नेहल लवांडे (डॉ. बाबासाहेब आंबेडकर छावणी परिषद शाळा), सना खान (नूतन माध्यमिक विद्यालय छावणी परिषद), अर्चना गिरी (महाराष्ट्र बालक मंदिर), अनुराधा मते-जाधव (न्यू लॉ कॉलेज), संतोष मुथा (रुपीबाई बोरा), अनिता तिवारी (किशोर संस्कृत संवर्धिनी), डॉ. मंगला भोसले (पेमराज सारडा महाविद्यालय), डॉ. माहेश्वरी गावित (पेमराज सारडा महाविद्यालय), सायरा खान (लिटिल चॅम्प्स फ्री स्कूल), हेमलता सानप (भिंगार हायस्कूल), सुनीता मोटे (न्यू आर्ट्स कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालय), सुनंदा करपे (न्यू आर्ट्स कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालय) नीलिमा शिंदे (भाऊसाहेब फिरोदिया), संगीता भंडारी (नवीन मराठी शाळा विश्रामबाग), पी.जी. केरुळकर (रेणुका माता प्राथमिक विद्यालय, केडगाव), सुनिता दिघे (भाग्योदय विद्यालय केडगाव), धनश्री गुंफेकर (समर्थ विद्यामंदिर सावेडी), प्राजक्ता केसकर (समर्थ विद्यामंदिर सावेडी), स्वाती औटी (अंबिका विद्यालय केडगाव), पूजा गोरे (अंबिका विद्यालय केडगाव), योगिता गांधी (सविता रमेश फिरोदिया), जयश्री उंडे (श्रीकांत पेमराज गुगळे हायस्कूल), डॉ. रूपाली एडांईत (राधाबाई काळे महिला महाविद्यालय) प्रियंका नागपुरे (राधाबाई काळे महिला महाविद्यालय), उज्वला गायकवाड (अहमदनगर महाविद्यालय), रूपाली कुलकर्णी (अहमदनगर महाविद्यालय), संजीवनी खंडागळे (अॅबट मायादेवी हायस्कूल), मनीषा गवळी (विश्वशंकर प्राथमिक विद्यालय भिंगार), फरहाना शेख (पी.ए. इनामदार स्कूल), सारिका आनंद (चित्रकूट इंटरनॅशनल स्कूल), रेवती पागा (चित्रकूट इंटरनॅशनल स्कूल).