अहमदनगर,दि.४ जानेवारी,(प्रतिनिधी)– जागतिक बुद्धिबळ संघटना व अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांच्या मान्यतेने अहमदनगर जिल्हा चेस सर्कलच्या वतीने प्रथमच अखिल भारतीय १६०० पेक्षा कमी मानांकित खेळाडूंसाठी बुद्धीबळ स्पर्धाचे आयोजन शुक्रवार ६ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १० वा. बडिसाजन मंगल कार्यालय, स्टेशन रोड, नगर येथे संपन्न होत असल्याची माहिती राज्य बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष तथा अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी दिली. ३ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत भारतातून तसेच राज्यातून खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवार दि. ८ रोजी दुपारी ४ वा. होणार आहे, अशी माहिती उपाध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी यांनी दिली.
अहमदनगर जिल्ह्यात प्रथमच अखिल भारतीय १६०० पेक्षा कमी मानांकित खेळाडूंसाठी अशी बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना ३१ हजार रुपयांची रोख पारितोषिक मिळणार आहे. ही संपूर्ण स्पर्धा शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फौंडेशनच्यावतीने आयोजीत केली आहे असे सचिव यशवंत बापट यांनी सांगितले. ९ वर्षा खालील खेळाडूंना, महिलांना, जेष्ठांना व विनामानांकित खेळाडूंना सुध्दा रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक गटात उतेजनार्थ 5 करंडक सुद्धा देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत प्रमुख पंच म्हणून प्रविण ठाकरे (जळगांव), सहाय्यक पंच पारुनाथ ढोकळे (नगर) हे काम पाहणार आहेत. या स्पर्धेत मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, गुजरात, तमिळनाडू तसेच पुणे, जळगांव, औरंगाबाद, नाशिक, ठाणे, मुंबई येथील एकूण २५० खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे.
स्पर्धा यशस्वीतेसाठी पारुनाथ ढोकळे, सुबोध ठोंबरे, शाम कांबळे, प्रकाश गुजराथी, देवेंद्र ढोकळे, चेतन कड, मनिष जसवानी, डॉ. स्मिता वाघ , सौ अनुराधा बापट, सौ शुभदा ठोंबरे आदि प्रयत्नशील आहेत. तरी ही विविध राज्यातील उत्कृष्ट बुद्धिबळ खेळाडूंचा खेळ व रोमांचकारी स्पर्धा पाहण्यासाठी नगरकरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे. आधिक माहिती साठी
यशवंत बापट (मो.9326092501),
पारुनाथ ढोकळे (मो.9850704268) यांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.