अहमदनगर,दि.३ जानेवारी,(प्रतिनिधी) – प्रत्येक मुलांमध्ये एक कला दडलेली असते. साहित्य, खेळ, समाजकार्य, राजकारण, शैक्षणिक, वैज्ञानिक यापैकी एखादा गुण आपल्या पाल्यांच्या अंगी असतोच हे ओळखणे हे पालकांचे कर्तव्य आहे. बालवयापासूनच पालक आपल्या मुलांवर दप्तरांच्या ओझ्या पेक्षा अपेक्षांचे ओझे जास्त लादत त्यामुळे दिवसेंदिवस मुलांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. मुलांना शारीरिक वाढीसाठी पौष्टीक अन्न पदार्थ खाण्याची सवय पालकांनी लावणे गरजेचे आहे. जगाची माहिती कमी वेळेत मिळवण्यासाठी मोबाईल व इंटरनेटचा उपयोग करा व ज्ञान मिळवा. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच ध्येयवादी राहून जीवन जगल्यास यशस्वी व्हाल. मुलांमध्ये कुटूंब, सर्वधर्म समभाव, राष्ट्र या विषयी आदर निर्माण होण्यासाठी शाळेच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबविले जातात ही कौतुकास्पद बाब असल्याचे प्रतिपादन पोलिस निरिक्षक संपतराव शिंदे यांनी केले.
सविता रमेश फिरोदिया प्रशालेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन पो.नि.संपतराव शिंदे यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने झाले. यावेळी उद्योजक दिलीप गुगळे, हेमा गुगळे, सिमा गुंदेचा, नूतन मोहमंद पठाण, मिलापचंद पटवा, चंद्रभान अगरवाल, आनंदलाल शिंगी, संस्थेचे अध्यक्ष दिलीप गुंदेचा, उपाध्यक्ष दशरथ खोसे, सचिव र.धों.कासवा, सहसचिव राजेश झालानी, विश्वस्त मनसूखलाल पिपाडा, चंद्रकांत अनेचा, कुंतीलाल भंडारी, बन्सी नन्नवरे, रमणलाल गांधी, एल.के.आव्हाड, बाळकृष्ण पात्रे, वसंतराव कर्हाडकर, विजयकुमार गुंदेचा, योगिता मुनोत, रिया गुंदेचा, सिया गुंदेचा, रमेश मुनोत, शिवनारायण वर्मा, रश्मी येवलेकर, माध्यमिकच्या मुख्याध्यापक प्र.दत्तात्रय कजबे, प्राथमिक मुख्याध्यापिका योगिता गांधी आदि उपस्थित होते.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष दिलीप गुंदेचा म्हणाले, संस्थेच्यावतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. शिक्षकांच्या सहकार्याने विविध स्पर्धा, परिक्षांमध्ये शाळेतील विद्यार्थी सहभागी होऊन यश संपादन करत आहेत. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम संस्था करत असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी दिलिप गुगळे, सिमा गुंदेचा, नूतन पठाण यांनीही शाळेच्या विविध उपक्रमांचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या.
प्रास्तविकात मुख्याध्यापिका सौ.योगिता गांधी म्हणाल्या, संस्था चालकांच्या सहकार्याने शाळेच्या प्रगतीचा आलेख उंचावत आहे. विद्यार्थ्यांना अभ्यास व्यतिरिक्त ज्ञानात भर घालणारे उपक्रम राबविले जात असतात. त्यामुळे विद्यार्थीचा सर्वांगिण विकास साधला जात असल्याचे सांगून शाळेचा प्रगतीचा अहवाल सादर केला. सूत्रसंचालन निलेश आंबेकर यांनी केले.