अध्यक्षपदी शिरीष टेकाडे तर सचिव पदी रमजान हवालदार यांची नियुक्ती
अहमदनगर,दि.३ जानेवारी,(प्रतिनिधी) – अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेच्या रविवारी (दि.१ जानेवारी) शहरातील माध्यमिक शिक्षक भवनात वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यामध्ये अध्यक्षपदी शिरीष टेकाडे तर सचिव पदी रमजान हवालदार यांची एकमताने निवड करण्यात आली.
सदर सभा माजी अध्यक्ष राजेंद्र लांडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेसाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून ३५० कौन्सिल सदस्य उपस्थित होते. सभेचे प्रास्ताविक सचिव जिजाबा हासे यांनी केले. संघटनेच्या कामकाजाचा अहवाल लांडे यांनी, तर ताळेबंद कोषाध्यक्ष जनार्दन पठारे यांनी मांडला.
नवीन पदाधिकारी निवडीपूर्वी माजी अध्यक्ष शिवाजीराव ढाळे यांनी निवड प्रक्रिया कशी होईल? ते सांगितले. सर्व सदस्यांमधून इच्छुकांची नावे मागविण्यात आली. सुमारे 50 नावे विविध पदांसाठी इच्छुकांकडून आली. सभेच्या मागणीवरून सर्वानुमते माजी अध्यक्ष यांची समिती गठीत करण्यात आली. त्यामध्ये बी.पी. बोलगे, आबासाहेब कोकाटे, शिवाजीराव ढाळे, राजेंद्र लांडे, सुरेश पाटील, सर्जेराव मते यांची समिती स्थापन केली. सर्व इच्छुक नावांची छाननी करून चर्चेद्वारे एक मताने नवीन पदाधिकारी निवडण्यात आले. सभेने त्याला एकमताने मंजुरी दिली.
अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेची नवीन कार्यकारणी पुढील प्रमाणे:- अध्यक्ष- शिरीष टेकाडे (नगर), सरचिटणीस- रमजान हवलदार (श्रीगोंदा), उपाध्यक्ष- सुदाम दळवी (पारनेर), मिलींद औटी (संगमनेर), भास्करराव कानवडे (अकोले), बाळासाहेब पाचरणे (राहुरी), सहसचिव- बाबासाहेब थोरात (श्रीरामपूर), अरुण बोरनारे (कोपरगाव), प्रमोद तोरणे (राहता), कोषाध्यक्ष- अशोक सोनवणे (नेवासा), हिशोब तपासणीस- भालचंद्र देशमुख (कर्जत), अविनाश नेहुल (पाथर्डी).
नुतन अध्यक्ष शिरीष टेकाडे यांनी यापुढील काळात जुनी पेन्शन योजना, अंशतः अनुदानित शाळांचे प्रश्न, शिक्षणाधिकारी कार्यालयातील अनागोंदी, काही खासगी संस्थांकडून शिक्षकांवर होणार्या अन्यायाला वाचा फोडून शिक्षकांचे विविध प्रश्नांना प्राधान्य देऊन सर्वांना विश्वासात घेऊन कार्य केले जाणार आहे. सर्व कामकाज संघटनेच्या घटनेनुसार राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. नानासाहेब सुद्रिक यांनी आभार मानले.