स्वराज्य शिक्षक संघटनेचा बदल्यांसाठी अजूनही संघर्ष चालूच
अहमदनगर,दि.३१ डिसेंबर,(प्रतिनिधी) – राज्यातील जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रिया सुरू झाली आहे, राज्यात संवर्ग 1 मध्ये जवळपास 8500 शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. संबंधित गुरुजीं बदली झाल्यामुळे आनंदीत आहेत, कारण ही बदली प्रक्रिया भ्रष्टाचार मुक्त पार पडत आहे. यातील काही गुरुजींनी दिलेल्या ऑनलाईन पसंती क्रमानुसार शाळाच उपलब्ध न झाल्यामुळे, आहे त्याच शाळेवरच राहावे लागणार आहे. बदली आदेश डिसेंबर २०२२ अखेर आले असले, तरी कार्यमुक्तीचा आदेश मात्र पुढील वर्षात १८ फेब्रुवारी २०२३ नंतरच हाती पडणार आहे.
ही 2022 ची ऑनलाईन बदली प्रक्रिया सुरू करण्यासाठी स्वराज्य शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य चे राज्य अध्यक्ष गजानन पांचाळ, संघटनेचे राज्य समन्वयक अशोक कुटे, सुनील निचीत, सूर्यकांत नागरगोजे, अनिल वडमुले, अरविंद खंडागळे, कावळे सर, सोनटक्के सर ,वंदना पाचरणे, अनिल स्वामी, निमकर सर, सर्जे सर, नाबगे मॅडम, बाळासाहेब खामकर, मानसी थोरात लोंढे मॅडम, सरोदे मॅडम इत्यादी पदाधिकाऱ्यांनी थेट मंत्रालय स्तरापासून संघर्ष केला. मंत्री गिरीश महाजन साहेबांच्या भेटी, आवर सचिव उर्मिला जोशी मॅडम, कक्ष अधिकारी इप्पर साहेब, शिक्षक आमदार, इत्यादींच्या भेटी घेऊन वेळोवेळी पाठपुरावा केला. अजूनही ही शिक्षक संघटना बदली विरोधात आलेल्या 5 याचिकेबाबत कोर्टामध्ये लढत आहे.
जिल्हा परिषद शाळांवरील शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या वेगवेगळ्या संवर्गातून केल्या जातात. बदली प्रक्रिया पारदर्शक व्हावी, यासाठी ऑनलाईन पद्धती अवलंबिण्यात आली. बदलीसाठी पात्र शिक्षकांनी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर पडताळणी करण्यात आली. या काही शिक्षक प्रक्रियेपूर्वीच ‘आऊट’ झाले. चुकीची माहिती सादर केलेल्या गुरुजींवर कारवाईचा बडगाही उगारण्यात आला. सर्व प्रक्रियेअंती संवर्ग १ मधून राज्यातून 8500 हजार शिक्षकांची बदली झाली आहे, बदली होते की नाही याकडे संबंधित गुरुजींच्या नजरा लागल्या होत्या. अखेर शुक्रवारी संबंधितांना मेल प्राप्त झाला.
संवर्ग 2 साठी करा अर्ज….
संवर्ग १ मध्ये पात्र ठरलेल्या शिक्षकांचे बदली आदेश शुक्रवारी धडकल्यानंतर लागलीच संवर्ग दोनमध्ये पात्र ठरलेल्या शिक्षकांसाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी या शिक्षकांना सुद्धा ऑनलाईन अर्ज भरावे लागणार आहे, या अर्जामध्ये जास्तीत जास्त 30 पसंती क्रम त्यांना द्यावे लागणार आहेत.
यानंतर संवर्ग १ प्रमाणेच त्यांचे बदली आदेश निघतील. मात्र, कार्यमुक्तीसाठी त्यांना प्रतीक्षाच करावी लागणार, हे विशेष. संवर्ग दोन चे आदेश निघाल्यानंतर संवर्ग 3 साठी ऑनलाईन अर्ज भरणे सुरू होईल, संवर्ग तीन मध्ये अवघड क्षेत्रात कार्य करणाऱ्या शिक्षकांचा समावेश असतो, संवर्ग न 3 नंतर संवर्ग 4 चे ऑनलाईन अर्ज भरणे सुरू होईल. बदली प्रक्रिया घडवून आणल्या बाबत व कोर्टामध्ये लढा चालू ठेवल्या बाबत स्वराज्य शिक्षक संघटनेचे राज्यभरातील शिक्षकाकडून अभिनंदन होत आहे .
ही बदली प्रक्रिया होऊ नये यासाठी राज्यभरातून मुंबई नागपूर औरंगाबाद या उच्च न्यायालयामध्ये एकूण पाच याचिका दाखल झालेले आहेत. न्यायालयात देखील आम्ही लढा चालू ठेवला आहे. त्यामध्ये आम्ही नक्कीच यश मिळवू.
गजानन पांचाळ, अध्यक्ष स्वराज्य शिक्षक संघटना