Homeनगर शहरदिवाळी सामाजिक जाणिवेने साजरी करा - सौ. वीणा बोज्जा

दिवाळी सामाजिक जाणिवेने साजरी करा – सौ. वीणा बोज्जा

मूकबधिर वस्तीगृहास बोज्जा कुटुंबियांकडून फटाके वाटप

अहिल्यानगर,(प्रतिनिधी) – दिवाळी सणानिमित्त बोज्जा कुटुंबियांकडून अपंग संजीवनी सोसायटीचे मूकबधिर विद्यालय वस्तीगृहातील मुला मुलींना फटाके वाटप करण्यात आले. या वेळी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा, मा. नगरसेविका सौ. वीणा बोज्जा, भावेश बोज्जा, वृषाली बोज्जा, पूर्वजा बोज्जा, सोनाली बोज्जा, राणी बोज्जा व मनोज बोज्जा उपस्थित होते.

या वेळी वीणा बोज्जा यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, दिवाळी सण हा हिंदू धर्माचा मोठा सण असून हा सण सर्व जाती धर्मातील लोक साजरा करतात. हा सण आपण कौटुंबिक साजरा न करता सामूहिक साजरा करणे काळाची गरज आहे. अनेक जण आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे साजरा करत नाही या साठी आपली सामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्येकाने सामूहिक रित्या दिन दुबळ्यांना बरोबर घेऊन साजरा करणे काळाची गरज आहे म्हणून प्रत्येकाने आप आपल्या परीने शक्य होईल तितके गरजवंताना मदत करावी.

संस्थेचे चेअरमन मधुकरजी भावले साहेब, संचालिका सौ विद्या भावले मॅडम, मुख्याध्यापक जगधने, विशेष शिक्षिका भोंडवे, कला शिक्षिका श्रीमती जेजुरकर, विशेष शिक्षिका श्रीमती कदम मॅडम, विशेष शिक्षक भांड, विशेष शिक्षक ढाकणे, वाचा उपचार तज्ञ अझर आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!