Homeक्राईमबहिणीच्या नवऱ्याचा भर रस्त्यात कुऱ्हाडीने वार करत केला खून

बहिणीच्या नवऱ्याचा भर रस्त्यात कुऱ्हाडीने वार करत केला खून

चार तासात पोलिसांनी केले आरोपीला अटक

अहमदनगर,दि.३० डिसेंबर,(प्रतिनिधी) – बहिणीला पळवून नेल्याचा राग मनात धरून भावाने आपल्या भाऊजीचा औरंगाबाद-पुणे महामार्गावर दहेगाव बंगलाजवळ इसारवाडी फाटा येथे भर रस्त्यावर कुऱ्हाडीने सपासप वार करून निर्घृण खून केला. सख्या बहिणीने शेजारच्या तरुणासोबत पळून जाऊन आंतरजातीय लग्न १४ वर्षापूर्वी केले होते. त्याचा मनात राग धरून लहान भावाने १४ वर्षांनंतर मेहुण्यावर कुऱ्हाडीने सपासप ६ वार करत निर्घृणपणे खून केला. या घटनेमुळं खळबळ माजली असून, आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथे सचिन व बाबासाहेब दोघेही शेजारी राहत होते. १४ वर्षापूर्वी बाबासाहेबने सचिनच्या बहिणीला पळवून नेत तिच्यासोबत आंतरजातीय विवाह केला होता. यावेळी सचिन अवघ्या १० वर्षांचा होता. या घटनेमुळं समाजात सचिनच्या कुटुंबियाना वेगळी वागणूक मिळत असे. तसेच आंतरधर्मीय विवाह आणि बहिणीनेही केलेल्या विवाहामुळे गावात लोकांकडून आई-वडिलांचा अपमानास्पद वागणूक मिळत होती. याचा राग सचिनच्या मनात कायम होता, त्यामुळे सचिनने लहानपणीच मेहुण्याचा काटा काढायचा निर्णय घेतला होता. आणि १४ वर्षानंतर बहिणाच्या नवऱ्याचा काटा काढला. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी २९ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास हा थरार घडला. श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील आरोपी सचिन शामराव नाटकर रा.भोकर व फिर्यादी हे एकमेकांचे नातेवाईक असून त्यांच्यात अनेक वर्षांपासून वाद होता. खिल्लारे याने १४ वर्षांपूर्वी आरोपीच्या बहिणीला पळवून नेवून तिच्याशी विवाह केला होता.

सदर घटना गुरुवारी सायंकाळी ४.४० वाजता इसारवाडी फाट्यावर घडली. सचिन शामराव नाटकर (२४, रा. भोकर, ता. श्रीरामपूर) असे आरोपीचे नाव आहे. घटनेनंतर दुचाकीवरून फरार झालेल्या सचिनला पोलिस निरीक्षक सचिन इंगोले यांनी दोन तासांत ताब्यात घेतले. तर मृताचे बाबासाहेब खिल्लारे (३४) असे नाव आहे. भावोजीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहून मेहुण्याने रक्ताने माखलेली हातातील कुऱ्हाड वर करून महामार्गावरच नाचत करत आसुरी आनंद व्यक्त केला. या घटनेमुळं रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडल्याने औरंगाबादहून नगरच्या दिशेने जाणारी वाहने पुढे न जाऊ शकल्याने ७ किमीपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती.

घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलिसांसह सहायक पोलीस आयुक्त अशोक थोरात, वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन इंगोले, सहायक पोलीस निरीक्षक ए पी लोंढे, उपनिरीक्षक सखाराम दिलवाले यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. बापू खिल्लारे याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. दरम्यान, आरोपीच्या शोधार्थ पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. भर रस्त्यात झालेल्या या थरारक घटनेदरम्यान वाळुज महामार्गावरील दुतर्फा वाहनांची कोंडी झाली होती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!