Homeनगर शहरहोलसेल फटाका मार्केटच्यावतीने कैलास खरपूडे यांचा सन्मान

होलसेल फटाका मार्केटच्यावतीने कैलास खरपूडे यांचा सन्मान

फटाका असोसिएशन ने केलेला सन्मान मला ऊर्जा देणारी -कैलास खरपूडे

अहिल्यानगर,(प्रतिनिधी) – कल्याण रोडवर अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशनचे वतीने अहमदनगर जिल्हा नगरी सहकारी बँक असोसिएशनच्या तज्ञ संचालकपदी फटाका असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष व भिंगार अर्बन बँकेचे जेष्ठ संचालक कैलास खरपूडे यांचा सन्मान फटाका असोसिएशनचे अध्यक्ष गजेंद्र राशीनकर व सचिव श्रीनिवास बोज्जा यांचे हस्ते करण्यात आला. या वेळी उपाध्यक्ष सुरेश जाधव, सहसचिव अरविंद साठे कोषाध्यक्ष शिवराम भगत आदींसह सदस्य उपस्थित होते.

यावेळी सत्काराला उत्तर कैलास खरपूडे म्हणाले फटाका असोसिएशनचा माझा जुना ऋणानुबंध आहे. अनेक वर्षे मी फटाका व्यवसाय केलेला आहे व असोसिएशनचा पदाधिकारी म्हणूनही काम केलेले आहे. आज माझा सन्मान असोसिएशनने केल्यामुळे माझी नक्कीच ऊर्जा वाढेल व यापुढे ही मी बँकेच्या मार्फत असोसिएशनच्या सदस्यांना व्यवसाय करण्यासाठी योग्य ते सहकार्य करण्याचा प्रयत्न करेल.

या वेळी फटाका असोसिएशनचे श्रीनिवास बोज्जा यांनी कैलास खरपूडे यांच्या बाबत माहिती दिली. अमोल तोडकर यांनी प्रास्ताविक केले, विकास पटवेकर यांनी आभार मानले. यावेळी फटाका व्यापारी असोसिएशन चे जेष्ठ सदस्य देवीदास ढवळे, संजय सुराणा, अमोल तोडकर, दाजी गारकर, संभाजी कराळे, विकास पटवेकर, विजय मुनोत, उमेश क्षीरसागर, अविनाश जिंदम, सागर हरबा आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!