नगर तालुका, (प्रतिनिधी) – नगर तालुक्यातील आगडगाव येथील श्री भैरवनाथ विद्यालय
या विद्यालयाचे माजी शिक्षक प्रभाकर खेडकर यांनी आज विद्यालयाला भेट दिली. या भेटीत त्यांनी विद्यालयातील विद्यार्थी व विद्यालयाच्या विकासासाठी काही तरी देणे लागतो या उदात्त भावनेने विद्यालयाला रुपये २१ हजार रुपयाचा निधी धनादेश स्वरूपात विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक गोरक्षनाथ कराळे यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यालयाचे मुख्याध्यापक साळुंके यांच्याकडे सुपूर्द केला.
माजी शिक्षक खेडकर यांनी विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या निधीचे सर्वांनी कौतुक केले. यावेळी खेडकर यांनी विद्यार्थ्यांना मोबाईल आणि सोशल मीडियाच्या आहारी न जाता अभ्यास आणि करिअरवर लक्ष केंद्रित करण्यासाठी बहुमोल असे मार्गदर्शन केले. याप्रसंगी श्री भैरवनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक तसेच सर्व सेवकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.