किरीट सोमय्यांच्या पत्नीने जिंकला अब्रूनुकसानीचा खटला,
अहमदनगर, (आँनलाईन प्रतिनिधी) – अब्रुनुकसानीच्या खटल्यात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना शिवडी दंडाधिकारी न्यायालयानं दोषी ठरवत संजय राऊत यांना १५ दिवसांची कैद आणि २५ हजारांचा दंडही आकारण्यात आला आहे.
किरीट आणि त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी १०० कोटींचा सार्वजनिक शौचालय घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्याविरोधात मेधा सोमय्यांनी राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता. रेकॉर्डवरील कागदपत्रं, चित्रफिती पाहता प्रथमदर्शनी संजय राऊत यांनी १५ आणि १६ एप्रिल रोजी मेधा सोमय्यांविरोधात संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचल्याचं न्यायालयाने सांगत कलम ४९९ नुसार शिक्षा स्पष्ट केली आहे.
अब्रुनुकसानीच्या खटल्यात दोषी ठरवण्यात आलेले उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना कोर्टाकडून १५ दिवसांची कैद सुनावण्यात आली होती. मात्र आता राऊतांना मोठा दिलासा मिळाला आहे. दंडाधिकारी कोर्टाकडून संजय राऊतांना अंशत: दिसाला मिळाला असून सत्र न्यायालाच्या निकालाविरोधात अपील करण्यासाठी शिक्षेला ३० दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे. कोर्टाने १५ हजाराच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर केला आहे.