जामखेडचे सुपुत्र दिग्दर्शक अल्ताफ शेख यांच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय मानाचा तुरा
जामखेड,(तालुका प्रतिनिधी) – जामखेड चे लेखक, दिग्दर्शक अल्ताफ शेख यांच्या कर्मयोगी आबासाहेब या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय दर्जाचा पुरस्कार मिळाला आहे. वेडा बीएफ, बेतुका, कम ऑन विष्णू, ब्रेक डाऊन धारावी कट्टा असे एकाहून एक सरस व ज्या चित्रपटांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक झाले असे चित्रपटाचे दिग्दर्शक अल्ताफ शेख यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. कर्मयोगी आबासाहेब या चित्रपटाची इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये निवड झाली आहे. यासाठी साऊथ आफ्रिका येथे कर्मयोगी आबासाहेब या चित्रपटाचे स्क्रीनिंग झाले. यावेळी या चित्रपटाचे कौतुक करत अल्ताफ शेख यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
वाणिज्य दुत, पनामा, हेड ऑफ रीजन मेरीटाईम ऑथरिटी जिजस कॅंपोस, डॉ.अमजदखान, नाशिकच्या विभागीय आयुक्त संगीता धायगुडे यांच्या हस्ते अल्ताफ शेख यांना सन्मानित करण्यात आले. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघाचे तब्बल अकरावेळा आमदार आणि दोन वेळा कॅबिनेट मंत्री झालेले आबासाहेब ऊर्फ स्व.गणपतराव देशमुख यांच्या जीवन चरित्रावर कर्मयोगी आबासाहेब हा चित्रपट तयार करण्यात आला आहे.
या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक शेख यांनी केले आहे. मायाक्का माऊली फिल्म प्रोडक्शन आणि मुंबई किएशन एंटरटेनमेंट निर्मित कर्मयोगी आबासाहेब या चित्रपटाचे बाळासाहेब एरंडे व मारुती बनकर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. २५ ऑक्टोबर २०२४ ला संपूर्ण जगभर हिंदी आणि मराठी भाषेत रिलीज होत आहे
दिग्दर्शक शेख यांनी वेडा बीएफ, बेतुका, कम ऑन विष्णू, ब्रेक डाऊन धारावी कट्टा, असे एकाहून एक सरस चित्रपटांचे लेखक, दिग्दर्शन केले आहे. कर्मयोगी आबासाहेब या चित्रपटात या चित्रपटात प्रमुख भूमिका अभिनेता अनिकेत विश्वासराव साकारत असून हर्षद जोशी, विजय पाटकर, अभिनेत्री देविका दप्तरदार, निकिता सुखदेव, सैराट’ फेम अरबाज शेख, तानाजी गुलगुंडे, अहमद देशमुख, सुरेश विश्वकर्मा, प्रदीप वेलणकर, अनिल नगरकर, प्रतीक प्रताप (छोटा पुढारी ) घनश्याम दरोडे वृंदा बाळ आदी कलाकारांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत.
या चित्रपटास प्रसिद्ध संगीतकार अवधूत गुप्ते यांनी संगीत दिले आहे, तर चित्रपटातील गाणी बॉलीवूड सिंगर कुणाल गांजावाला आणि मनीष रांजणे यांनी गायली आहेत. छाया चित्रकार कुमार डोंगरे, स्टील फोटोग्राफर राजेंद्र कोरे, वेशभूषा संगीता चौरे व पोर्णिमा मराठे, एक्झिक्युटिव्ह प्रोड्यूसर अमजदखान शेख, प्रोडक्शन कंट्रोल (सफर) उर्फ सय्यद दादासो शेख पोस्ट प्रोडक्शन मॅनेजिंग अविनाश जाधव विशेष सहकार्य उल्हास धायगुडे पाटील यांचे आहे.