अहमदनगर,(प्रतिनिधी) – बिग बॉस मराठीच्या आजच्या भाऊच्या धक्क्यावर सुरुवातीला रितेश एक मजेदार टास्क घेतो. फिरत्या चक्रावर उभं राहून सदस्यांना एकमेकांचं कौतुक करायचं असतं. या टास्कसाठी जोडया तयार केल्या जातात. सुरुवातीला डीपी दादा आणि वर्षा ताई चक्रावर फिरत एकमेकांचं कौतुक करतात. पुढे अभिजीत आणि अंकिता येतात. अभिजीत, ‘अंकिता कान लावून हापूस आंबा किडला आहे की नाही हे ओळखते.’ असं म्हणतो. त्यानंतर अरबाज आणि जान्हवी मग वैभव आणि पॅडी दादा चक्रावर फिरत एकमेकांना टोमणे मारत कौतुक करतात. काही व्यक्तींमधल्या चांगल्या गोष्टीसुद्धा दिसतात म्हणून हा टास्क होता, असं रितेश सर्वांना सांगतो.
तसेच त्यानंतर काढा पिण्याचा टास्क दिला जातो. रितेश पुढे ‘नाचगाण्याचा कल्ला’ हा टास्क घेतो. या टास्कसाठी दोन टीम तयार केल्या जातात. एका टीममध्ये वर्षा ताई, जान्हवी, पॅडी दादा, सूरज, अरबाज हे सदस्य असतात तर दुसऱ्या टीममध्ये निक्की,अंकिता, वैभव, अभिजीत, संग्राम, धनंजय हे सदस्य असतात. जी टीम जिंकेल त्या टीमला ५०,००० बीबी करन्सी मिळणार असते. मात्र दोन्ही टीमला सारखे गुण मिळतात. त्यामुळे रितेश दोन्ही टीमना बीबी करन्सी समान वाटून घेण्यास सांगतो. बिगबॉस मराठीच्या घरातील वैभव चव्हाणचा प्रवास इथेच संपला असून तो या आठवड्यात कमी मतांमुळे एलिमिनेट झाला आहे.