यंदा एवढंच मागणं बाप्पाला -” वाचव रे चिमुकलीला, जगंव रे गोडुलीला”
अहमदनगर,(प्रतिनिधी) – येथील माणिक चौक येथे रोटरी क्लब ऑफ अहमदनगर व माणिक चौक मित्र मंडळाच्या वतीने यंदाच्या वर्षी आंतरराष्ट्रीय नोबेल पीस अवॉर्डने नामांकित डॉ. सुधा कांकरिया यांच्या मार्गदर्शनाखाली ‘यंदाच्या सणाला एवढंच मागणं बाप्पाला, वाचव रे चिमुकलीला जगव रे गोडुलीला’ सेव्ह गर्ल – सेफ गर्ल या विषयावर अत्यंत प्रभावी आरासची उभारणी करण्यात आली आहे. यामुळे नक्कीच सकारात्मक सामाजिक परिवर्तन होईल असे मत रोटरी क्लब ऑफ अहमदनगरचे अध्यक्ष श्री नितिन थाडे यांनी व्यक्त केले.
सदर आरासीचे उद्घाटन अमेरीकाहुन रोटरीच्यावतीने निलेश वैकर परिवारात आलेली परदेशी पाहुणी कुमारी गुनिवर, तसेच चि. आर्वी अमित बोरकर, चि. ओवी रविंद्र राऊत, भक्ती शहापूरकर, जिज्ञासा दासी, धनश्री दासी, अंकीता चवंडके, हिंदवी निकम, पूर्वा मिसाळ या बालिकांच्या हस्ते संपन्न झाले. सदर प्रसंगी प्रोजेक्ट चेअरमन डॉ. सुधा कांकरिया, पुरूषोत्तम जाधव, सुभाष गर्जे, डॉ. प्रकाश कांकरिया, रविंद्र राऊत, अनघा राऊत, प्रिती बोरकर, भावना वैकर, अक्षय निकम, अक्षय शहापूरकर, विशाल शहापूरकर आदी उपस्थित होते. त्या प्रसंगी ‘मुलगी वाचवा सुरक्षित ठेवा’ या विषयाच्या माहिती पत्रकाचे प्रकाशन व वितरण करण्यात आले.
गुनिवर म्हणाल्या की, गणपती उत्सव मला खुप आवडला. भारतीय सण मला आवडतात व आज गणपती आरास द्वारे मुली वाचवा, सुरक्षित ठेवा यावरील आरासीचे उद्घाटन करण्याची मला संधी मिळाली त्याबद्दल आनंद वाटतो. सदर आरासीमधील ‘चिमुकलीचे मनोगत’ ऐकुन हृदय हेलावुन जाते. या आरासीद्वारे सकारात्मक सामाजिक परिवर्तनाची लाट निर्माण होईल असा विश्वास वाटते.
सदर आरासीबद्दल माहिती देतांना डॉ. सुधा कांकरिया म्हणाल्या की वर्तमान काळातील परिस्थिती अत्यंत बिकट आहे. मुली वरील तसेच स्त्रियांवरील अत्याचार वाढत चालले आहेत. आजची मुलगी मातेच्या गर्भातही सुरक्षित नाही व शाळेत कॉलेजमध्ये, समाजामध्ये ही सुरक्षित राहिली नाही. स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी जन आंदोलन होण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक स्त्री व पुरूषांनी यात सक्रीय सकारात्मक सहभाग घेतला पाहिजे. गणेश उत्सवा निमित्याने हजारो लोक आरास पाहतात. त्यांच्या हृदयाला हा विषय नक्की भिडेल आज मुलगी जगली वाचली तरच जग वाचणार आहे. अन्यथा पुढची पिढी आपणास माफ करणार नाही. सकारात्मक सामाजिक परिवर्तनाची सुरूवात स्वत:पासुन केली पाहिजे.
चि. आर्वी, चि. ओवी यांनी ‘बेटी बचाओ, सुरक्षित रखो’ च्या घोषणा दिल्या. माणिक चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री अक्षय निकम म्हणाले की डॉ. सुधाताईंच्या मार्गदर्शनाखाली सेव्ह गर्ल – सेफ गर्ल थीम राबवितांना आम्हाला समाधान वाटत आहे. यामुळे परिसरातील सगळयाच मुली आनंदीत झाल्या आहे. उत्साहाने ते सहभागी होत आहेत. मुलींना वाचवणे हे पुण्याचे कार्य आहे. सदर उपक्रम आम्ही वर्षभर राबविणार आहेात. शेवटी सचिव गर्जे यांनी आभार मानले. सदर कार्यक्रमात प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती आणि चिमुकलीचे मनोगत ऐकु न सर्वांचे हृदय हेलवाले होते.