अहमदनगर,(प्रतिनिधी) – भारतात काही सोशल मीडिया अप्लिकेशन आपोआप लॉगऑऊट झाले आहेत. त्यांची संपूर्ण सर्व्हिस डाऊन आहे. याबाबत अजून कोणतीही अपडेट आली नाही. इंस्टा देखील डाऊन असल्याची माहिती मिळत आहे. वापरकर्त्यांच्या मोबाईलवर सेशन एक्सपायर्ड असे मॅसेज आले त्यानंतर सोशल मीडिया अकाऊंट लॉगऑऊट झाले आहेत. पुन्हा लॉगइन केल्यानंतर पासवर्ड नाकारल्या जात आहे. परंतु आपला पासवर्ड चुकीचा नाही. सोशल मीडिया होम पेजवर जाण्याऐवजी त्यातून तुम्हाला आपोआप बाहेर काढले जात आहे.
तुमचा लॉग इन कालबाह्य झाला आहे असा एरर मेसेज दिसेल आणि तुम्ही परत लॉग इन करण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुमची क्रेडेन्शियल्स नाकारली जातील. लॉग आऊट परिणाम इतर माध्यमात देखील होत आहे. मात्र तुमचा पासवर्ड बदलण्याची गरज नाही. सध्या फक्त सेवा खंडीत आहेत.