Homeनगर शहरघर घर लंगर सेवेच्या वतीने सायकलपटू जस्मितसिंह वधवा यांचा सन्मान

घर घर लंगर सेवेच्या वतीने सायकलपटू जस्मितसिंह वधवा यांचा सन्मान

शहरात सायकल चळवळ रुजवून पर्यावरण व आरोग्य सदृढतेसाठी लंगर सेवा प्रयत्न करणार – जनक आहुजा

अहमदनगर,दि.२ सप्टेंबर,(प्रतिनिधी) – येथील सायकलपटू जस्मितसिंह वधवा यांनी जगातील सर्वात जुनी सायकलिंग इव्हेंट असलेल्या पॅरिस-ब्रेस्ट-पॅरिस सायकल राईडमध्ये यशस्वी सहभाग नोंदविल्याबद्दल त्यांचा घर घर लंगर सेवेच्या वतीने सन्मान करण्यात आला.
घर घर लंगर सेवेचे सेवादार असलेले जस्मितसिंह वधवा चार वर्षातून एकदा होणारी पॅरिस-ब्रेस्ट-पॅरिस सायकल राईड यशस्वीपणे पूर्ण करणारे जिल्ह्यातील एकमेव सायकलपटू ठरल्याने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी लंगर सेवेचे जनक आहुजा, प्रितपालसिंह धुप्पड, हरजितसिंह वधवा, लायन्स क्लबचे अध्यक्ष धनंजय भंडारे, डॉ. संजय असनानी, प्रशांत मुनोत, कैलाश नवलानी, जतीन आहुजा, दलजीतसिंह वधवा, मनोज मदान, राजू जग्गी, अनिश आहुजा, राजा नारंग, सुनिल थोरात, सहेजकौर वधवा आदी उपस्थित होते.

जनक आहुजा म्हणाले की, पॅरीसच्या सायकल राईडमध्ये यशस्वी सहभाग नोंदवून जस्मितसिंह वधवा यांनी शहराचे नाव उंचावले आहे. तर तो लंगर सेवेच्या माध्यमातून सामाजिक योगदान देत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून आजपर्यंत सुरु असलेल्या लंगर सेवेत त्याचे योगदान राहिले आहे. शहरात सायकल चळवळ रुजवून पर्यावरण व आरोग्य सदृढतेसाठी लंगर सेवेच्या माध्यमातून देखील प्रयत्न केले जाणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तर गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप उपक्रमात देखील लंगर सेवेने दिलेल्या योगदानाची माहिती दिली.
सत्काराला उत्तर देताना जस्मितसिंह वधवा यांनी लंगर सेवेचे सेवादार व मित्र परिवाराने दिलेल्या पाठबळ व प्रोत्साहनाने ही सायकल राईड यशस्वी करु शकलो. यामध्ये अनेक अडथळे आले. त्यावर मात करुन पुढे जाण्याची शक्ती लंगर सेवेच्या समाजकार्यातून मिळाली. तर पॅरीसच्या सायकल राईडमध्ये सहभाग नोंदवून पॅरिस-ब्रेस्ट-पॅरिस दरम्यानचा 1200 कि.मी. चा प्रवास 87 तासात पूर्ण करणारे जस्मितसिंह वधवा यांनी आपला थरारक अनुभव विशद केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!