Homeनगर शहरनववर्षानिमित्त अनामप्रेम तर्फे गझलसंध्या कार्यक्रमाचे आयोजन

नववर्षानिमित्त अनामप्रेम तर्फे गझलसंध्या कार्यक्रमाचे आयोजन

अहमदनगर,दि.२९ डिसेंबर,(प्रतिनिधी) – येत्या 1 जानेवारी 2023  रोजी नववर्षानिमित अनामप्रेम तर्फे गझलसंध्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ कवी कमलाकर आत्माराम  तथा आबा देसले यांच्या स्मृती या कार्यक्रमात जागविल्या जाणार आहेत. नगर मधील ख्यातकिर्त गझलकार कमर सरुर  यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्यातून विविध  गझलकार उपस्थितीत असणार आहेत.

या गझलसंध्या कार्यक्रमात गझलकार सतीश दराडे, आकाश कंकाळ, मारूती  मानेमोड, अमिता पैठणकर, अभिजित काळे, संजय गोरडे, संदिप पटेल, जयश्री वाघ, रेणूका पुरोहित, सानिका दशसहस्र हे गझल सादर करणार आहेत. या गझल संध्या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शिवकुमार डोईजोडे, विश्व मराठी साहित्य संमेलनचे अध्यक्ष दगडू लोमटे, जेष्ठ समाजसेवक डॉ.गिरीश कुलकर्णी, जेष्ठ पत्रकार भूषण देशमुख, प्रसिद्ध गझल गायक पवन नाईक, अनामप्रेम विश्वस्त व इकरा संस्थेचे इकबाल सय्यद, उद्योजक फिरोज तांबटकर , विकार भाई काझी, रवींद्र  मकासरे , अमित सोनी हे उपस्थित राहणार आहेत. 

या गझलसंध्या   कार्यक्रमाची संकल्पना स्वामी अभ्यासिकेच्या संचालिका सोनाली विशाल वाघमारे यांची आहे. यावेळी नगर शहरातील दिव्यांग बहुसंख्येने उपस्थित राहणार आहेत. हा गझलसंध्या कार्यक्रम सावेडीतील रावसाहेब पटवर्धन सभागृह येथे सायंकाळी 6 ते 8 यावेळेत होणार आहे.  नगर मधील गझलप्रेमींनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन इंजि.अजित माने, जे.आर मंत्री, अभय रायकवाड, दीपक बुरम, डॉ मेघना मराठे यांनी केले आहे. या कार्यक्रमाचे आयोजनासाठी प्रतीक्षा मुनतोडे, विलास शिंदे, राहुल खिरोडे, अमृत भुसारी परीश्रम घेत आहेत .

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!