नमाज इस्तिस्काचे पठण करुन अल्लाहकडे पावसासाठी केली जाणार प्रार्थना
अहमदनगर,दि.२ सप्टेंबर,(प्रतिनिधी) – तब्बल महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने राज्यात दुष्काळाची छाया गडद होत चालली आहे. दुष्काळाचे नैसर्गिक संकट टाळण्यासाठी व चांगला पाऊस पडावा म्हणून शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने रविवारी (दि.3 सप्टेंबर) नमाज इस्तिस्काचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मौलाना नदीम अख्तर यांनी दिली.
ईदगाह मैदान येथे सकाळी 10:30 वाजता पावसासाठी अल्लाहकडे प्रार्थना करण्यासाठी विशेष नमाज होणार आहे. या नमाजसाठी समस्त मुस्लिम बांधवांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पाऊस लांबल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे. त्यामुळे पिके करपू लागली आहे. तसेच पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. एकंदरीत राज्यात दुष्काळाची छाया गडद होत चालली आहे. हे संकट दूर व्हावे आणि पाऊस पडावा म्हणून मुस्लिम समाज बांधव नमाज पठण करुन, संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी व दुष्काळी परिस्थितीच्या संकटातून सर्वांची सुटका करण्यासाठी अल्लाहकडे पाऊस पडण्यासाठी सामूहिक दुवा करणार आहे.