राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने शहरातील महाविद्यालयांना निवेदन
अहमदनगर,दि.४ ऑगस्ट,(प्रतिनिधी) – नुकत्याच झालेल्या घटनांमध्ये न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज चा विद्यार्थी युवराज गुंजाळ या विद्यार्थ्यांवर बसमधून उतरत असताना कॉलेजच्या दोन नंबर गेटवर काही गुंड प्रवृत्तीच्या विद्यार्थ्यांनी कोयत्याने डोक्यात वार करून खुणी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये सदर विद्यार्थी गंभीररित्या जखमी झाला असून या हल्ल्यामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या जीवितच धोका निर्माण झाला असून तसेच शिक्षक व प्रशासकीय सेवकांच्याही जीवितास धोका निर्माण झालेला आहे. या हल्ल्यामुळे आवारात असलेले सीसीटीव्ही बंद असल्यामुळे पोलीस प्रशासनास हल्लेखोराणा पकडण्यात आले नाही. पोलीस तपास यंत्रणेस मदत झाली नाही. अनेकदा बाहेरचे मुले मुलींची छेड काढण्यासाठी कॉलेजच्या परिसरात येत असतात त्यामुळे कॉलेज परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसून चालू करण्याची मागणी आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेलचे गजानन भांडवलकर यांच्या वतीने करण्यात आली.
महाविद्यालयाच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेलच्या वतीने न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. वी.बी.सांगडे यांना निवेदन देताना राष्ट्रवादी कामगार सेलचे जिल्हा अध्यक्ष गजानन भांडवलकर समवेत राष्ट्रवादीचे जिल्हा कार्य अध्यक्ष अभिजीत खोसे, रेश्माताई आठरे, साधनाताई बोरुडे, युवक शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर, निलेश बांगरे, अंजली आव्हाड, अक्षय भिंगारदिवे, विशाल म्हस्के, अनंतराव गारदे, सुमित कुलकर्णी, पवन कुमटकर, वैभव शेवाळे, धीरज उकिरडे, शिवम करांडे, ओमकार झावरे, सागर पानसरे, प्रणव कदम आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष अभिजीत खोसे म्हणाले की कॉलेज परिसर भरताना व सुटताना पोलिसांनी बंदोबस्त द्यावा तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे मुलींची होणारी छेडछाड कमी होणार व कॉलेजच्या आवारात फिरणारे रोड रोमिओ यांना आळा बसणार असल्याचे सांगत कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आयकाड कंपल्सरी करण्याची मागणी देखील करण्यात आली. व न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या महाविद्यालयातील परिसरात सर्व महत्त्वाच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसून चालू करण्यात यावे अन्यथा 11 ऑगस्ट पर्यंत सीसीटीव्ही यंत्रणा चालू झाली नाही तर विद्यार्थ्यांचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.