Homeनगर जिल्हानगर-कल्याण महामार्गावर मोठा अपघात; तीन ठार

नगर-कल्याण महामार्गावर मोठा अपघात; तीन ठार

अहमनगर, ८ जून २०२३ – नगर-कल्याण महामार्गावर मोठा अपघात झाला आहे. वडगाव आनंद गावच्याशिवारात चौगुलेवस्तीजवळ मोटारसायकलला टेम्पो ट्रॅव्हल्स बसने दिलेल्या धडकेत मोटारसायकलवरील दोघे जागीच ठार झाले. हि घटना बुधवारी (७ मे) रात्री आकारावाजेच्या सुमारास घडली आहे. हे अपघातग्रस्त परप्रांतीय असून, आळेफाटा येथे एका खाजगी बेकरीत कामानिमित्त आलेले आहे. मायातांमध्ये एका अल्पवयीन मजुराचा समावेश आहे.

अपघातातील मृतांची नावे योगेश रामकुमार (वय २१), चाहात बाबुराव (वय १७), संजीव कुमार (वय २४) सर्व राहणार उत्तरप्रदेश अशी आहेत.

याबाबत आळेफाटा पोलिसांनी सांगितले की, आळेफाटा येथे असलेल्या एका खाजगी बेकरीत काम करणारे मजूर बुधवारी रात्री कल्याण रोडवर एकाच दुचाकीने जेवण करण्यासाठी गेले होते. रात्री सुमारे साडेअकरा वाजण्याच्या सुमारास त्यांना विरुद्ध दिशेने आलेलेया (एमएच ०४ एचवाय ८७३०) टेम्पो ट्रॅव्हल्स बसने दुचाकीवर जाणाऱ्या तिघांना जोराची धडक दिली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!