सावेडी नाट्य संकुलचे काम तातडीने मार्गी लावण्याची मागणी
अहमदनगर,दि.७ जुन,(प्रतिनिधी) – सावेडी नाट्य संकुलाचे काम तातडीने मार्गी लावण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मनपा आयुक्त यांना निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर महापालिका प्रशासनाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना काम सुरू असल्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर सहा जून रोजी नाट्य संकुलाची प्रत्यक्ष जाऊन पाहणी करण्यात आली मात्र तेथे संत गतीने काम सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व नाट्य कलाकार यांच्या वतीने मनपा आयुक्त यांच्या कार्यालयामध्ये उपोषण करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष अभिजीत खोसे यांनी दिला होता. सावेडी नाट्य संकुलाची प्रत्यक्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व नाट्य कलाकार यांनी संयुक्त पाहणी केली असता तेथे कुठल्याही प्रकारचे काम चालू नसून सावेडी नाट्य संकुलाचे काम तातडीने चालू करून पूर्णतत्त्वाकडे नेण्यासाठी महानगरपालिकेमध्ये आमरण उपोषण करताना राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अभिजीत खोसे समवेत श्रेणिक शिंगवी, नितीन लीगडे, क्षितिज झावरे, निनाद बेडेकर, स्वप्निल मनोत, राहुल सुराणा, नाना मोरे, अयुब खान, महेश काळे, केतन क्षीरसागर, पवन नाईक, जालिंदर शिंदे, श्याम शिंदे, किरण डीडवानिया, पुष्कर तांबोळी, संतोष शिंगटे, ऍड.गजेंद्र दांगट, सोमनाथ तांबे, अभिजीत खरपुडे, महेंद्र कवडे, निलेश घुले, सुशांत डोईफोडे आदीसह पदाधिकारी कलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अभिजीत खोसे म्हणाले की नाट्य कलाकार हे अनेक वर्षापासून शहरात नाट्य संकुल उभे राहावे यासाठी पाठपुरावा करुन आंदोलने मोर्चे केलेली आहे. तसेच आमदार संग्राम जगताप यांनी नाट्य संकुलच्या कामासाठी राज्य शासनाकडून मोठा निधी उपलब्ध करून दिला असून मात्र मनपा प्रशासन व ठेकेदाराच्या निष्क्रिय व उदासीन धोरणामुळे आज तगायात नाट्य संकुलाचे काम अर्धवट अवस्थेत आहे. हे काम जलद गतीने पूर्ण करून नाट्य कलाकार व नगरवासीयांना उपलब्ध करून द्यावे व नगर शहरातील नाट्यकर्मी कलावंतांना त्यांच्या हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे व या कामाची पाहणी केली हे वास्तु शहरातील महानगरपालिकेची सर्वात मोठी वास्तू होणार असून त्या वास्तूचे खंडर मध्ये रूपांतर झाले असून तेथे कोणत्याही प्रकारे काम चालू नसल्याचे निदर्शनास आले याच्या निषेधार्थ मनपा कार्यालयात आमरण उपोषण चालू करण्यात आले व जोपर्यंत नाट्य संकुलाच्या कामाची शाश्वती देत नाही तोपर्यंत उपोषण चालू राहणार असल्याचे सांगून नगर शहरातील नाट्य कलावंतांनी आपल्या कलेचे उपोषणा ठिकाणी सादरीकरण केले. तर आयुक्त डॉ.पंकज जावळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व नाट्य कलावंतांची बैठक घेऊन नाट्य संकुलाचे काम 19 जून रोजी सुरू होणार असून यामध्ये उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करून दर महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी बैठक घेतली जाईल व डिसेंबर अखेर नाट्य संकुलाचे काम पूर्ण केले जाणार असल्याचे आश्वासन दिले.