अहमदनगर,दि.७ जून,(प्रतिनिधी) – धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवन चरित्र, पराक्रम आणि त्यांचे बलिदान हे संपूर्ण भारताला माहीत व्हावे यासाठी त्यांच्या जीवनावर ‘शंभूगाथा’ हे महाकाव्य हिन्दी मधून युवा कवि अभी मुंडे यांनी लिहिले आहे. त्यांचे सादरीकरण शुक्रवार दिनांक ९ जून रोजी सायंकाळी ठीक ६.३० वाजता माऊली संकुल सभागृह, झोपडी कँटिन, नगर मनमाड रोड, सावेडी इथे होणार आहे. नितीन उदमले फाउंडेशन मार्फत या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नानासाहेब जाधव हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. तरी या कार्यक्रमाला शिवशंभू प्रेमीनी मोठ्या संखेने उपस्थित रहावे असे आवाहन नितीन उदमले फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रहार करे तो धरती कांपे! कडकडता वो वज्र हे शंभू ! भस्म का जो जो शृंगार करे ! वो महादेव का रुद्र हे शंभू !! अशा शब्दात युवा कवी अभि मुंडे यांनी संभू राजांचे वर्णन या महाकाव्यात केले आहे. त्यांनी हे काव्य हिन्दी भाषेत लिहिले असल्याने आता शंभू राजांचे चित्र चरित्र संपूर्ण भारताला माहिती होणार आहे. नितीन उदमले फाउंडेशन यांनी हे कार्य हाती घेतले आहे. युवा कवी अभि मुंडे यांचे काव्य सादरीकरण आणि व्याख्यानाचे कार्यक्रम सातत्याने आयोजित करण्याचे ठरविण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून त्या सप्ताहाच्या अंतिम टप्प्यात हा कार्यक्रम पार पडतो आहे. तरी त्याचा लाभ सर्वानी घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. हा कार्यक्रम विनामूल्य असून कार्यक्रमाला होणारी गर्दी लक्षात घेता सर्वांनी कार्यक्रमाच्या अर्धा तास अगोदर येऊन माऊली संकुल सभागृह येथे येऊन स्थानापन्न व्हावे अशी सूचना देण्यात आली आहे