मुंबई, १९ मे २०२३ – वातावरणामुळे उकाड्यात कमालीची वाढ
राज्याच्या कमाल तापमानात चढउतार सुरू असताना उन्हाच्या चटक्याने नागरिक हैराण झाले आहेत. ढगाळ वातावरणामुळे उकाडा कमालीचा वाढला आहे.
आज कमाल तापमानात चढउतार कायम राहण्याची शक्यता आहे. पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सोमवारी विदर्भात तुरळक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
राज्यासह देशात अनेक राज्यांमध्ये तापमानाने चाळीशी ओलांडली आहे. दरम्यान राज्यात विदर्भ, आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांचे तापमानही 40 अंश सेल्सियसच्या पुढे गेले आहे. कोकण किनारपट्टीवर कमाल तापमान कमी असले तरी आर्दता अधिक आहे. परिणामी, उकाड्यात कमालीची वाढ झाली आहे. तापमान 35 ते 40 अंशांच्या दरम्यान होते. गेल्या २४ तासात राज्यात नोंदवले गेलेले कमाल तापमान
पुणे ३८.५ (२३.४), जळगाव ४०.५, धुळे ४०, कोल्हापूर ३७.६ (२२.६), महाबळेश्वर ३२.९ (१९.२), नाशिक ३७ (२२.१)
निफाड ३८.६ (२३.८), सांगली ३९.२ (२२.९), सातारा ३९.४ (२२.२), सोलापूर ४०.७ (२६.२), सांताक्रूझ ३३.२ (२६.६), डहाणू ३४ (२७.४), रत्नागिरी ३४.६ (२६.५),
मान्सून कधी? नैऋत्य मोसमी वाऱ्यांसाठी अंदमान बेटांवर वातावरण पोषक असून उद्यापर्यंत (20) दक्षिण बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान आणि निकोबार बेटांवर मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पूर्व उत्तर प्रदेश आणि परिसरात समुद्रसपाटीपासून ९०० मी उंचीवर चक्राकार वारे सक्रीय असल्याने मध्य प्रदेश , विदर्भ ते तेलंगणापर्यंत कमी दाबाचा पट्टा आहे.
राज्यात उन्हाचा तडाखा वाढला..
RELATED ARTICLES
Recent Comments
Hello world!
on