जाणून घ्या आज बुधवार दिनांक २८ डिसेंबर २०२२ रोजीचे आपले राशिभविष्य
मेष – तुमच्या खेळकर-खोडकर स्वभावामुळे अवतीभोवतीचे वातावरण प्रसन्न बनेल. अविवाहित आहेत त्यांची भेट खास व्यक्तीसोबत होण्याची शक्यता.
वृषभ – आर्थिक जीवनात आज आनंद राहील. यासोबतच तुम्ही आज कर्जापासून मुक्त होऊ शकता. घरातील वातावरण उत्साही राहील.
मिथुन – मित्र तुमच्या खुल्या मनाची आणि सहनशक्तीची परीक्षा पाहतील; पण तत्त्वांना शरण न जाता विवेकी निर्णय घेण्याची खबरदारी घ्या.
कर्क – आज तुमच्या कलात्मक क्षमतेमुळे अनेक लोकांची कौतुकाची थाप मिळेल आणि अनपेक्षित बक्षीसही मिळेल.
सिंह – प्रिय व्यक्तीच्या भावना समजून घ्या. तुमच्या संकल्पना अपयशी ठरणार नाहीत, याची खात्री होत नाही तोपर्यंत त्या कोणालाही सांगू नका.
कन्या – दिवसभर तुमचे प्रेम बहरत जाणार आहे. सगळ्यासाठी प्रेम हाच पर्याय आहे. याची आज तुम्हाला जाणीव होईल.
तूळ – अत्यंत व्यग्र वेळापत्रकातदेखील आपले आरोग्य चांगले असेल; पण आयुष्याची काळजी घेणे, ही आपली गरज आहे.
वृश्चिक – उद्दिष्ट गाठू शकाल, अशा योजना वास्तववादी असतील, याची काळजी घ्या. पुढील पिढ्या या कामासाठी आपली सतत आठवण ठेवतील.
धनु – दिवसाच्या उत्तरार्धात होणारी एखाद्या जुन्या मित्राची भेट उल्हासित करेल. चांगल्या संवादामुळे आज तुम्हाला हुरुप येईल.
मकर – तुमचा विश्वास वाढत आहे आणि प्रगती होणे अपरिहार्य ठरेल. प्रवास आणि शैक्षणिक सहली यामुळे जागरुकतेत वाढ होईल.
कुंभ – आज तुमचा फायदा होईल. कारण, कुटुंबातील सदस्य तुम्हाला सकारात्मकद़ृष्ट्या प्रतिसाद देतील. मन प्रसन्न राहील.
मीन – प्रेमात आज तुम्ही तुमच्या अधिकाराचा वापर करा. तुमच्या कामाला दाद मिळेल. आर्थिक आवक चांगली झाल्याने मनोबल उंचावेल.