हेल्थ, १२ मे २०२३ – भारतात झोपेच्या अनेक समस्या आहेत. बरेचदा असे होते की, रात्री झोप घेऊनही आपल्याला दिवसा झोप येते किंवा आपल्याला आळस येतो. त्यामुळे कामाच्या वेळी आपल्याला एकाग्रतेने काम करणे जवळजवळ अशक्य होते.
परंतु, असे का होते. झोपेचे कालचक्र हे जवळपास ८ तासांचे असते. ८ तासांची पुरेशी झोप घेऊनही आपल्याला सकाळी झोप का येते ? यामागे नेमके कारण काय ? ही गोष्ट साधारण आहे की, कोणता गंभीर आजार याविषयी डॉक्टर काय सांगतात जाणून घेऊया.
1. निद्रानाशाचा वाढता त्रासः
दिवसभर थकल्यानंतर प्रत्येकाला पुरेशा प्रमाणात झोप हवी असते. तज्ज्ञांच्या मते, एका व्यक्तीला कमीत-कमी 7 ते 8 तासांची झोप आवश्यक असते. परंतु, हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला त्याच्या हक्काची झोप मिळतेच असं नाही. अनेक लोकांना झोप न लागणे, मध्येच जाग येणे, अपूर्ण झोप अशा समस्यांना सामोरे जावे लागते. यामागे एक विशिष्ट कारण आहे.
2. रात्रीची अचानक जाग का येते?
भारतातील प्रसिद्ध आरोग्यतज्ज्ञ निखिल वत्स यांच्या मते झोप न लागणे, मध्येच जाग येणे, अपूर्ण झोप या लक्षणांमागे इंसुलिन रेजिस्टंस (Insulin Resistance)कारणीभूत आहे. यामध्ये एड्रेनालाईन किंवा ग्लाइकोजन ज्याला रक्तात साखर साठून राहणे असे देखील म्हटले जाते आणि याला एक गंभीर समस्येचे रुप प्राप्त होते. डॉक्टरांच्या मते एड्रेनालाईन थकवा आणि हार्मोनल कर्टिसोल उलट मार्गाने वाढते. सर्वसाधारणपणे हार्मोन सर्कडियन लयातूम जातात. कर्टिसोल पहाटे 2:30 च्यादरम्यान सर्वात कमी बिंदूवर असते आणि सकाळी 8:00 वाजता सर्वोच पातळीवर असते. परंतु एड्रेनालाईन थकव्यामुळे 2:30 च्या दरम्यान कर्टिसोलमध्ये वाढ होते आणि आपल्याला रात्रीची जाग येते.
3. हार्मोन्स इम्बॅलेन्स
अनेकदा रात्री झोप पूर्ण न झाल्याने तुम्हाला सकाळी उठल्यानंतर थकवा जाणवू लागतो. याला हार्मोनल इम्बॅलेन्स कारणीभूत असू शकते. साधारणपणे शरीरातील साखरेला यकृतात साठवले जाते आणि रात्री शरीरात हळूहळू सोडली जाते. जर ही प्रक्रिया झाली नाही तर साखरेची पातळी वर-खाली होऊ शकते. ज्यामुळे आपली झोप कमी होऊ शकते. हे इंसुलिन रेसिस्टंसमुळे होते. जे तुम्हाला रात्री सतत लघवी करण्यास भाग पाडते. रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्यास असे होऊ शकते.
4. यावरील उपायः
तज्ज्ञांच्या मते निद्रानाशापासून वाचण्यासाठी आपल्या आहारात थोडा बदल करणे आवश्यक आहे.
आपल्या दैनंदीन आहारात इलेक्ट्रोलाइट्स पोटॅशियम, कॅल्शियम आणि मँग्नीशियम युक्त पदार्थांचा समावेश करावा.
खासकरुन चहा-कॉफीसारख्या कॅफीनयुक्त अधिक उष्ण पदार्थांचे सेवन करणे टाळावे.
ताण-तणावापाासून दूर रहावे.
चालणे हा एक उत्तम पर्याय आहे.