मुंबई, दि.११ मे २०२३ – राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा अंतिम निकाल समोर आला आहे. तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी अपात्र ठरवलेल्या 16 आमदारांबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवले आहे. आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे या आमदारांचा निर्णय घेणार असल्यामुळे, ते आमदार पात्रच आहेत यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे. या निर्णयामुळे एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचं वाचन केलं. यावेळी पाचही न्यायाधीश कोर्टात उपस्थित होते.
राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीकोणातून आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालय काही तासातच निकाल देणार आहे. राज्यातील सत्तासंघर्षाच्या कालाची प्रतिक्षा गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील राजकीय वर्तुळाला होती. त्याचा निकाल आता सर्वोच्च न्यायालय जाहीर करत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे कोर्टाने हा दिलासा दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी तो राजीनामा द्यायला नको होता. तो दिला त्यामुळे पुढील अडचणी वाढल्या. आम्ही त्यावेळी काही करु शकलो असतो. ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे अनेक अडचणी वाढल्या.