Homeनगर शहरअहमदनगर मध्ये बुलेट चोरून विल्हेवाट लावणाऱ्या‎ टोळीचा पर्दाफाश

अहमदनगर मध्ये बुलेट चोरून विल्हेवाट लावणाऱ्या‎ टोळीचा पर्दाफाश

अहमदनगर, ९ मे २०२३ – अहमदनगर ‎ शहरात बुलेटची चोरी करून त्याचे‎ पार्ट सुटे करून विल्हेवाट‎ लावणाऱ्या टोळीचा कोतवाली‎ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.‎ याप्रकरणी चौघांना अटक करण्यात‎ आली आहे . त्यातील चोरांना दोन दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात‎ आली आहे.‎

२० फेब्रुवारी रोजी मनीष‎ मदनलाल फुलढाळे यांची बुलेट‎ ख्रिस्त गल्ली येथून चोरीला गेली‎ होती. या गुन्ह्याचा तपास करताना‎ चोरीस गेलेली बुलेट अहमद मुन्ना‎ शेख (रा. मुकुंदनगर) याने चोरी‎ केली व ती साथीदार शाहरुख‎ आलम शेख (रा. नागरदेवळे)‎ याच्या घरात लपवून ठेवल्याची‎ माहिती कोतवाली पोलिसांना‎ मिळाली.

पोलिसांनी या दोघांना‎ ताब्यात घेतले. त्यांनी सदर बुलेट‎ आम्ही चोरुन नंतर तीचे सर्व‎ स्पेअरपार्ट वेगवेगळे करुन ते भंगार‎ दुकानदार जावेद रऊफ शेख (रा.‎ सादिकमळा, भिंगार) व राम‎ विलास ससाणे (रा. गजराजनगर)‎ यांना विक्री केल्याची कबुली दिली आहे.‎

पोलिसांनी त्यांना अटक करुन‎ चोरीस गेलेल्या बुलेटचे स्पेअर‎ पार्टस्, इंजिन, चेसीज हस्तगत‎ केली आहे. अधिक तपास पोना‎ बाळासाहेब मासळकर हे करीत‎ आहेत. कारवाई पोलिस निरीक्षक‎ चंद्रशेखर यादव, गुन्हे शोध पथकाचे‎ पोसई मनोज कचरे, पोहेकॉ तनवीर‎ शेख, पोहेकाँ गणेश धोत्रे, पोना‎ योगेश भिंगारदिवे, पोना ए. पी.‎ इनामदार आदींनी केली.‎

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!