मुंबई, ५ मे २०२३ (ऑनलाईन वृत्त) – गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. एकीकडे उष्ण वातावरण तर दुसरी कडे पाऊस अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.
येत्या दोन दिवसात पश्चिम बंगालच्या उपसागरात ‘मोचा’ चक्रीवादळ धडकणार आहे. यामुळे हवामानात पुढील काही दिवस बदल होण्याची शक्यता वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असल्याने अनेक राज्यांमध्ये पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
नाशिक, अहमदनगर, पुणे, मराठवाड्यामध्ये परभणी लातूर आणि हिंगोली या भागांमध्ये गारपीट आणि मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या भागात हवामान विभागाने ऑरेंट अलर्ट जारी केला आहे. शेतकऱ्यांना आपल्या पिकांचे संरक्षण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात गेल्या आठवड्यापासून पावसाने थैमान घातले आहे. शेतात तयार झालेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नाशिकमध्ये कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे.
अहमदनगरसह ‘या’ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा इशारा, जाणून घ्या
RELATED ARTICLES
Recent Comments
Hello world!
on