नगर शहरातील धक्कादायक घटना
अहमदनगर,दि.५ मे,(प्रतिनिधी) – नगर शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये आरोपीने पत्नीची निर्घृणपणे हत्या करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अहमदनगर शहरातील स्टेशन रोडवरील शिवनेरी चौक परिसरातील ही भयंकर घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पत्नीचा लोखंडी रॉड मारून खून करून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
अहमदनगर शहरातील स्टेशन रोडवरील शिवनेरी चौक परिसरात हि धक्कदायक घटना घडली आहे. यामध्ये आरोपी पतीने आधी पत्नीची निर्घृणपणे हत्या केली त्यानंतर आरोपीने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. आशा संदीप गुजर असे हत्या करण्यात आलेल्या मृत पत्नीचे नाव आहे तर संदीप रामचंद्र गुजर असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे.
पती-पत्नीमध्ये घरगुती वादातून ही घटना घडल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असला तरी अद्याप कारण स्पष्ट झाले नाही. घरात सामानाची पडझड झाल्याचे दिसत असल्याने पती-पत्नीमध्ये झटापट होऊन संदीपने पत्नीचा खून केल्याचा तर्क लावला जात आहे. गुजर दाम्पत्याच्या ने मागे तीन विवाहित मुली व एक अविवाहित मुलगा असा परिवार आहे.
आरोपी पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करून तिची निर्घृणपणे हत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत आरोपीने पत्नीची हत्या करून स्वतः आत्महत्या का केली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. कोतवाळी पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.