Homeमहाराष्ट्रदेशात अवकाळीचे संकट:राज्यांत 2 दिवस गारपीट-पावसाचा इशारा

देशात अवकाळीचे संकट:राज्यांत 2 दिवस गारपीट-पावसाचा इशारा


मुंबई,१ मे २०२३ (ऑनलाईन वृत्त) – राज्यांत 2 दिवस गारपीट-पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या दिवसांत देशातील अनेक राज्यांमध्ये मान्सूनची चाहूल लागली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडमधील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. तमिळनाडू, केरळ, कर्नाटक, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, राजस्थान, पश्चिम हिमालयीन प्रदेश, वायव्येकडील मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये 3 मेपर्यंत हवामान असेच राहील. हवामान खात्याचे म्हणणे आहे की, यात 4 मेपासून बदल होईल.

गेल्या 24 तासांत या राज्यांतील अनेक भागात थंडी वाढली आहे. मध्यप्रदेशच्या भोपाळमध्ये रविवारी दुपारी 2.30 वाजता किमान तापमान 18.6 अंशांवर गेले. राजस्थानमध्येही अशीच परिस्थिती आहे. 9 शहरांचे तापमान 30 अंशांच्या खाली राहिले. जयपूर, सीकर, नागौर, अलवर, बारन, बिकानेरसह राज्यातील बहुतांश भागात पाऊस आणि गारा पडल्या. दिल्ली, पंजाब, बिहार, यूपीमध्येही तापमानात 3 ते 5 अंशांनी घट झाली आहे.

या 11 शहरांत पुढील 2 दिवस किमान तापमान 20 किंवा त्यापेक्षा कमी राहण्याचा अंदाज हवामान खात्यानुसार, डेहराडून, पुणे, दिल्ली, भोपाळ, जबलपूर, कोहिमा, भीलवाडा, जालंधर, बरेली, गया आणि हरदोई येथे 2 आणि 3 मे रोजी किमान तापमान 20 किंवा त्याहून कमी राहण्याची शक्यता आहे.

वारा खंडितता प्रणालीमुळे राज्यात अवकाळी पाऊस सुरू असून सोमवार, 1 मे रोजी विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात हलक्या पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे. दरम्यान, मराठवाड्यात रविवारी नांदेड, परभणी आणि छत्रपती संभाजीनगरात पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. नाशिक जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला, जळगाव जिल्ह्यात जामनेर तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा बसला, तर चोपड्यात गारपीट झाली आहे.

राज्यात गत तीन दिवसांपासून अवकाळी पावसाचे वातावरण आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे उन्हाची तीव्रता कमी आहे. रविवारी राज्यात महाबळेश्वर येथे कमाल 28 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. वाऱ्याचा वेग ताशी 15 ते 20 किलोमीटर असल्याने सरासरी कमाल तापमानही पाच ते सहा अंश सेल्सियसने घसरले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!