Homeनगर शहरलग्नातील वऱ्हाडी मंडीळीनी ऐकला पंतप्रधान मोदी यांचा मन की बात कार्यक्रम

लग्नातील वऱ्हाडी मंडीळीनी ऐकला पंतप्रधान मोदी यांचा मन की बात कार्यक्रम

अहमदनगर,दि.१ मे,(प्रतिनिधी) – लग्नातील वऱ्हाडी मंडीळी ‘मन कि बात’मध्ये मग्न झाल्याचे पाहायला मिळाले. अमहदनगर जिल्ह्यातील भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रा.भानुदास बेरड यांनी आपल्या मुलीच्या लग्नातच मोठ्या एलईडी स्क्रीनवर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या ‘मन कि बात’चे प्रसारण चक्क मंगल कार्यालयातच केले. आज मन कि बात कार्यक्रमाचा शंभरावा भाग प्रसारीत करण्यात आला. आज लग्नतीथही मोठी असल्याने कार्यकर्त्यांची अडचण लक्षात घेऊन भाजपाचे प्रदेश कार्यकाणी सदस्य प्रा.भानुदास बेरड यांनी कार्यकर्त्यांसाठी लग्नातच मन की बात कार्यक्रमासाठी आयोजन केले होते. एकीकडे लग्नातील सनईचा सुर तर दुसरीकडे ‘मन कि बात’ मधील पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे १०० वा कार्यक्रमात विचार ऐकण्यात मग्न झालेले वऱ्हाडी मंडळी पहावयास मिळाली.

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा ‘मन कि बात’ हा कार्यक्रम देशभर लोकप्रिय आहे. महिन्याच्या शेवटच्या रविवारी होणारा हा कार्यक्रम देशभरातील जनता मन:पुर्वक ऐकतात. भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रा.भानुदास बेरड यांच्या मुलीचे रविवार दि. 30 एप्रिल रोजी लग्न असल्याने जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते, अप्तेष्ट यांच्यासह भाजपाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना निमंत्रण देण्यात आले होते. भाजपच्या कार्यकर्त्यांबरोबरच नागरिकही मन कि बात नियमित ऐकत असल्याने प्रा.भानुदास बेरड यांनी मन कि बात’ ऐकण्यासाठी कार्यालयात व्यवस्था केल्याने लग्न, मन कि बात दोन्ही कार्यक्रम एकाच ठिकाणी व्यवस्थीत पार पडले.

या अनोख्या कार्यक्रमाचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कौतुक केले. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार चंद्रशेखर कदम, भाजप प्रदेश सचिव मनोज पांगारकर, जिल्हा बँकेचे चेअरमन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, नगर शहराध्यक्ष भैय्या गंधे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, अ‍ॅड.अभय आगरकर, आदिसह जिल्हातील पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांचे स्वागत वधूपिता प्रा.भानुदास बेरड यांनी केले. अँड युवराज पोटे यांनी सर्वांचे आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!