मुंबई,दि.१४ एप्रिल,(ऑनलाईन प्रतिनिधी) –
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाबाबत ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला होता. बंड करण्यापूर्वी एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले होते. भाजपसोबत गेलो नाही तर आपल्याला अटक होईल, असे शिंदेंनी सांगितल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले होते. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. आदित्य ठाकरे लहान आहेत, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विषयावरची चर्चा थांबवली.