संभाजीनगर, १४ एप्रिल २०२३-
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २ दिवसांत कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या दोन दिवसांत छत्रपती संभाजीनगर शहरात 24 नवीन कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे शहर आणि ग्रामीण भागांत मिळून जिल्ह्यात सध्या 52 सक्रिय रुग्ण आहे. ज्यात दोन रुग्ण हे ग्रामीण भागातील असून, 50 रुग्ण शहरातील आहे.
तर गेल्या दोन दिवसांत रुग्ण संख्या वाढली असून, ज्यात मंगळवारी रोजी 12 रुग्णांची नोंद झाली होती. तर बुधवारी आणखी 12 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता आरोग्य विभागाची देखील चिंता वाढली आहे.